आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून वर आलाय \'दगडू\', पॉकेटमनीसाठी घ्यायचा शिकवण्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘हम गरीब हुए तो क्या हुआ, दिल से अमीर है… हम जियेंगे अपनी मर्जी से और तुम पर मरेंगे भी अपनी मर्जी से… चला, हवा येऊ द्या…’ हा डायलॉग कानावर पडला की डोळ्यासमोर येतो तो दगडू… अर्थातच 'टाइमपास'मधला प्रेक्षकांचा लाडका प्रथमेश परब. प्रथमेशसाठी आजचा दिवस अतिशय स्पेशल आहे आणि त्याचे कारण म्हणजे त्याचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 23 वर्षे पूर्ण केली आहेत. 29 नोव्हेंबर 1993 रोजी मध्यमवर्गीय कुटुंबात त्याचा जन्म झाला. बालक पालक, टाइमपास, उर्फी या सिनेमांमुळे तो आता स्टार बनलाय. मात्र त्याचा हा प्रवसा खडतर परिस्थितीशी झगडत झालाय.
आज प्रथमेशच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला त्याच्या या प्रवासाविषयी आणि त्याच्या आवडीनिवडींविषयी सांगत आहोत...
घरची बेताची परिस्थिती
प्रथमेशला एक धाकटा भाऊ आहे. अंधेरी इस्टच्या नामदेव मिश्रा चाळीमधल्या एका सर्वसामान्य कुटुंबातून प्रथमेश आहे. वडील कँटीनमध्ये नोकरी करतात. तर आईदेखील एका कारखान्यात कामाला होती. मात्र आता प्रथमेशने स्वबळावर घरची परिस्थिती बदलली आहे. प्रथमेशला गेल्यावर्षी मुंबईतील सायन परिसरात म्हाडाचे घर मिळाले आहे. ''मला घर लागलंय याचा मला खूप आनंद झाला आहे. प्रत्येकाचे स्वप्न असते, की आपले मुंबईत घर असावे. माझे हे स्वप्न म्हाडामुळे पूर्ण झाले. माझी इच्छा होती की, मला सायनला घर मिळावे आणि तिथे कलाकारांसाठी केवळ एकच जागा असल्यामुळे ते थोडे कठीण होते. पण, मला प्रतिक्षानगरमध्ये (सायन) घर मिळाले. माझ्या आईबाबांच्या कष्टामुळेचे हे होऊ शकले आहे.'' असे प्रथमेश म्हणाला होता.
पुढे वाचा, पॉकेटमनीसाठी घ्यायचा शिकवणी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...