आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Actor Prathamesh Parab Celebrated His Birthday With Friends

प्रथमेश @ 22 : बर्थडे बॉयवर झाला झाला गिफ्ट्सचा वर्षाव, धमालमस्तीत झाले सेलिब्रेशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रथमेश आपल्या मित्रांसोबत आणि त्याचा बर्थडे केक - Divya Marathi
प्रथमेश आपल्या मित्रांसोबत आणि त्याचा बर्थडे केक
प्रेक्षकांचा लाडका दगडू अर्थातच अभिनेता प्रथमेश परब याचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 22 वर्षे पूर्ण केली आहेत. यंदाचा प्रथमेशचा वाढदिवस खूप स्पेशल आहे. कारण वाढदिवसाच्या दोन दिवसांपूर्वी त्याचा 'उर्फी' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. शिवाय त्याच्या खास मित्रांनीदेखील त्याचा वाढदिवस स्पेशल बनवला आहे. वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला प्रथमेशच्या जवळच्या मित्र त्याच्या घरी पोहोचून त्याला सुंदर सरप्राइज दिले. या मित्रांनी त्याच्यासाठी बर्थडे केकसोबतच काही गमतीशीर गिफ्ट्सदेखील आणलीत.
प्रथमेशने आपल्या फेसबुक अकाउंटवर या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटोज शेअर करुन मित्रांनी दिलेल्या गिफ्ट्सविषयी देखील सांगितले.
प्रथमेशने लिहिले, Special day (night) had great time with my ....friends
Birthday gifts
1- driving lessons from my ..... friends to enhance my driving skills .
2- wrist watch for my amazing timing
3- Diaries for my taxation 29 th nov 2015 to 28th nov 2016 !!!
या सेलिब्रेशनमध्ये प्रथमेशचे आईवडीलसुद्धा सहभागी झाले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा प्रथमेशच्या बर्थडे सेलिब्रेशनची छायाचित्रे आणि सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छादेखील देऊ शकता...