आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा 'डॅडी'च्या BRA गॅंगचा छुपा चेहरा 'विजय'ला, अर्जुनसोबत झळकतोय हा मराठी चेहरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  
असीम अहलुवालिया दिग्दर्शित आणि अर्जुन रामपाल-ऋत्विज पटेल निर्मित 'डॅडी' हा चित्रपट उद्या म्हणजे 8 सप्टेंबर रोजी रिलीज होतोय. अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीच्या खासगी आयुष्यावर डॅडीचे कथानक बेतले आहे. अरुण गवळी यांची BRA गँग ही त्यांच्या काळात फार नावारूपाला आली होती. बाबू, रामा आणि अरुण या तिघांची मिळून ही गँग होती. पण या गँगमध्ये अजून एक साथीदार होता ज्याचं नाव आहे 'विजय'. 
 
'डॅडी'मध्ये झळकणार आहेत अनेक मराठी कलाकार..
'डॅडी'मध्ये विजयची ही भूमिका साकारली आहे मराठमोळा अभिनेता पुर्णानंद वांढेकरने. अनेक मराठी सिनेमे आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पुर्णानंदने सोडलेली आहे. तुकाराम, फॅन्ड्री, आजचा दिवस माझा अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये त्याने आपली अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता डॅडी या चित्रपटात अभिनेता अर्जुन रामपालसोबत पुर्नानंद स्क्रिन शेअर करणार आहे. 'डॅडी'मध्ये बाबूच्या भूमिकेत आनंद इंगळे तर रामाच्या भूमिकेत राजेश शृंगारपुरे आहे. चित्रपटातील मुख्य पात्र अर्जुन रामपालने साकारले आहे. 
 
वीणा जामकरने केले पुर्णानंदचे कौतुक..
विशेष म्हणजे या चित्रपटातील अरुण गवळीची पत्नी आशा गवळींसाठी अभिनेत्री वीणा जामकरने डबिंग केले आहे. वीणाने पुर्णानंदसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करुन पुर्णानंदला शुभेच्छा दिल्या आहेत. वीणा लिहिले, ''अर्जुन रामपालच्या उद्या प्रदर्शित होणाऱ्या 'डॅडी' फिल्मसाठी मी आशा गवळी यांच्या भूमिकेसाठी डब केलंय आणि आपल्या अनेक मराठी कलाकारांनी या फिल्ममध्ये अप्रतिम भूमिका केल्या आहेत! त्यातलाच एक पुर्णानंद वांढेकर. अभिनंदन मित्रा. मराठी भाषिक कलाकारांचा मान-सन्मान आपल्या कामातून आणि व्यावसायिकपणातून असाच उत्तरोत्तर वाढत राहो! तुला भरपूर शुभेच्छा, लाईन लागू दे कामांची, सर्व कलाकारांचे मन:पूर्वक अभिनंदन! बऱ्याच वर्षानी असा कडक अंडरवर्ल्ड सिनेमा पहायला मिळाला." 
 
पुढील स्लाईड्सवर बघा, 'डॅडी' या चित्रपटातील पुर्णानंदच्या लूकची खास झलक..
बातम्या आणखी आहेत...