आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संग्राम साळवी बनला सुपरहिरो, वाचवले ह्या अभिनेत्रीचे प्राण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पन्हाळ्याच्या कड्यावर उभी असलेली अभिनेत्री अमृता संत
चित्रपटात एखादा एक्शन सीन असल्यावर अभिनेत्यांना हार्नेस लावून तो स्टंट सिक्वेन्स करून घेतला जातो. पण हार्नेस लावून सुध्दा कधी कधी अशी डेअरिंग करणं त्या एक्टरच्या जीवावर बेतू शकतं. तर मग जर चित्रीकरणादरम्यान एक्टरकडे हार्नेसच नसेल तर?...
अभिनेत्री अमृता संतला ‘पन्हाळा’ चित्रपटाचे चित्रीकरण करताना गडाच्या एका कड्यावर उभं राहून एक सीन करायचा होता, पण तिला त्यासाठी हार्नेस लावण्यात आला नव्हता. आणि तो सीन करताना ती अक्षरश: मरता मरता वाचलीय.
अमृता संतला या सीनबद्दल विचारल्यावर ती म्हणाली,”पन्हाळा चित्रपटात मी आणि संग्राम साळवी नवरा-बायकोच्या भूमिकेत आहोत. आमच्या भूमिकांचं नाव आहे, माधवी आणि स्वस्तिक. नुकतंच लग्न झालेलं हे जोडपं पन्हाळ्यावर फिरायला येतं. आणि या नवरा-बायकोंमध्ये असलेल्या मतभेदाच रूपांतर भांडणात होतं. आणि स्वस्तिक माधवील मला गडाच्या एका कड्याच्या जवळ घेऊन जाऊन सोडू का तूला या कड्यावरून असं रागाच्या भरात बोलतो. हा सीन करताना मी एकदम टोकावर उभी होते. मला पाठी उभ्या असलेल्या संग्रामकडे वळून त्याला घट्ट मिठी मारायची होती. पण वारा एवढा सुटला होता, की त्या घोंघावणा-या वा-यासकट मी कोणत्याही क्षणी खाली तोल जाऊन पडेन अशी परिस्थिती निर्माण झाली होती."
अमृता पुढे सांगते,"मला चित्रीकरणावेळी स्वत:ला सावरून वळताही येत नव्हतं. तेही कॅमेरामध्ये समजणार नाही अशा पध्दतीने मला युनिटच्या लोकांनी पाय पकडून वळवलं. संग्रामकडे वेगाने पाठी वळताना, नशीबाने मला संग्रामने हाताला घट्ट पकडलं. त्यामुळे मी खाली पडले नाही. मी वळले आणि संग्रमने माझा हात घट्ट पकडला. त्याने जर हात पकडला नसता किंवा धरलेला हात सोडला असता, तर मी त्यादिवशी त्या खाईतच पडले असते. नंतर त्याने हात एकदम घट्ट पकडल्याने हातात भरलेला काचेचा चुडा फुटला. त्या बांगड्या माझ्या हातात घुसल्या पण मी संग्राममुळे वाचले. “
पुढील स्लाइडमध्ये वाचा, काय झालं होतं नक्की त्यादिवशी सांगतोय संग्राम साळवी