आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'होणार सून मी ह्या घरची\'मधील \'श्री\' आहे इंजिनिअर, पाहा गेल्या काही वर्षात लूक्समध्ये झालेला बदल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - अभिनेता शशांक केतकर )
'होणार सून मी ह्या घरची' या झी मराठी वाहिनीवरील गाजत असलेल्या मालिकेतील सर्वांचा लाडका श्री अर्थातच अभिनेता शशांक केतकर आज आपला 29वा वाढदिवस साजरा करत आहे. अल्पावधीतच तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या शशांकचा जन्म 15 सप्टेंबर 1985 रोजी पुण्यात झाला.
इंजिनिअर आहे शशांक...
शशांकने ठाण्यातील व्हीपीएम पॉलिटेक्निकमधून डिप्लोमा केला. त्यानंतर पुण्यातील के. डी. वाय. पाटील कॉलेजमधून त्याने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. मुळात इंजिनिअर असलेल्या श्रीने ऑस्ट्रेलियातून मास्टर्स डिग्री मिळवली. याशिवाय तो एक राष्ट्रीय स्तरावरील स्विमरसुद्धा आहे. फोटोग्राफी, भटकंती हे शशांकचे आवडते छंद असून तो शाकाहारी आहे.
'पूर्णविराम' नाटकाद्वारे अभिनयाला सुरुवात...
शशांकने 'पूर्णविराम' या मराठी नाटकाद्वारे आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 'कालाय तस्मैः नमः' ही शशांकची पहिली मराठी मालिका. त्यानंतर सुवासिनी, स्वप्नांच्या पलीकडे, फिरुनी नवी जन्मेन, या मालिकांमध्ये त्याने छोटेखानी भूमिका साकारल्या. 'रंग माझा वेगळा' ही शशांकची मुख्य भूमिका असलेली पहिलीच मालिका होती. मात्र शशांकला खरी ओळख मिळाली ती झी मराठी वाहिनीवरील 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेमुळे. या मालिकेत शशांकने श्रीरंग नावाच्या उद्योजकाची भूमिका साकारली आहे. या मालिकेमुळे शशांक मराठी चित्रपटसृष्टीतील फ्रेश फेस असून तरुणींच्या गळ्याती ताईत बनला आहे.
व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण...
शशांकने नुकताच व्यावसायिक रंगभूमीवरसुद्धा प्रवेश केलाय. 'गोष्ट तशी गमतीची' या नाटकात शशांक महत्त्वपूर्ण भूमिका साकारतोय. दोन पिढ्यांमधील अंतर हा या नाटकाचा विषय आहे.
आज शशांकच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला त्याची मागील काही वर्षांतील छायाचित्रे दाखवत आहोत. ही छायाचित्रे शशांकच्या कॉलेज जीवनातील असून मागील काही वर्षांत शशांकच्या लूक्समध्ये झालेला बदल तुमच्या लक्षात येईल.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा गेल्या काही वर्षांत शशांकच्या लूक्समध्ये झालेला बदल...

(नोट - सर्व छायाचित्रे शशांकच्या ऑफिशिअल फेसबुक अकाउंटवरुन घेण्यात आली आहेत.)