आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘श्री’चा झाला मेकओव्हर, अमेरिकेत जाऊन बदलला शशांक केतकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शशांक केतकरचा झाला 'मेकओव्हर'
छोट्या पडद्यावरचा चॉकलेट हिरो म्हणजेच शशांक केतकर सध्या अमेरिकेत आहे. म्हणजे आता ‘होणार सून मी ह्या घरची’मध्ये काही अमेरिकेचा ट्रॅक वगैरे पाहायला मिळणार असा गैरसमज करून घेऊ नका. आणि तो तेजश्री प्रधानसोबत फिरायला गेला आहे, असाही गैरसमज करून घेऊ नका. शशांक सध्या अमेरिकेच्या लॉस एन्जलिसमध्ये चाललेल्या ‘बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळा’च्या १७व्या अधिवेशनाला गेला आहे.
या ‘बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळा’च्या समारोहाचे उद्घाटन झाल्यावर शशांक केतकरच्या ‘गोष्ट तशी गंमतीची’ नाटकाचा प्रयोग झाला. म्हणून शशांक तिथे गेला होता. पण सध्या अमेरिकेत गेलेला शशांक मस्त लॉस एन्जलिस सिटी फिरताना दिसतोय.
एवढेच नाही, तर शशांकने चक्क दोन वर्षांनी आपली मिशी आणि दाढीही काढलीय. गेली दोन वर्ष शशांकची मालिका ‘होणार सून मी ह्या घर’ची आपण टेलिव्हीजनवर पाहत आहोत. आणि त्यात शशांकची ओळख आहे, ती त्याची दाढीची वाढलेली खुंट. पण अमेरिकेला जाताच शशांकने आपल्या नाटकाच्या प्रयोगानंतर मस्तपैकी शहर पाहिले. आणि परत आल्यावर आपली दाढीची खुंट पहिल्यांदा काढून टाकली.
दाढी आणि मिशी उडवलेला शशांक चक्क कॉलेजमध्ये असल्यासारखा दिसू लागला आहे. शशांकची दाढीची खुंट तो परत मुंबईत येईपर्यंत वाढतील. पण आता शशांकला जरा बदललेल्या हवामानप्रमाणे आपला बदलेला लूकही मन रिलॅक्स करायला मदत करेल, असंच वाटतंय.
किमान शशांकचा तरी त्याला मिळालेल्या या सुट्टीत आपलं बॅचलरहूड पून्हा एकदा अनुभवण्याचा प्लॅन दिसतोय. सध्या लॉस एन्जलिस मधल्या वेगवेगळ्या ठिकाणी फिरून तो सेल्फी काढतोय. आणि स्वत:ची कंपनी एन्जॉय करतोय. बहूधा, परतल्यावर शशांकमधला नवा ‘कुल डुड’ आपल्याला अनुभवता येईल.
पूढील स्लाइ़डवर पाहा, शशांक केतकरचे अमेरिका पाहतानाचे 'सेल्फी'