आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहिदच्या \'कमिने\'त झळकलेल्या या मराठी अॅक्टरला तुम्ही ओळखता का! \'बंदुक्या\' आहे 50 वा सिनेमा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी आणि हिंदी चित्रपटांसोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे मराठमोळे अभिनेते म्हणजे शशांक शेंडे. त्यांची प्रमुख भूमिका असलेला 'बंदुक्या' हा चित्रपट आज (1 सप्टेंबर) रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने शशांक यांचे 50 चित्रपट पूर्ण होत आहेत. अलीकडेच त्यांचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता 'रिंगण' हा चित्रपट रिलीज झाला होता. आता बंदुक्या या चित्रपटात त्यांनी डोरल्या ही व्यक्तिरेखा साकारली आहे.
 
'बंदुक्या'मध्ये साकारली ग्रे शेडची भूमिका...
या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे वेगळेपण म्हणजे त्यांनी ग्रे शेडची भूमिका यात वठवली आहे. गावात सगळ्यांशी अवार्च्य भाषेत तो बोलतो. चांगलं जगण्यासाठी वाट्टेल ते करण्याची त्याची तयारी असते. त्यासाठी तो आपल्या मुलीच्या आयुष्याचाही विचार करत नाही. बिनधास्त बेधडक आणि तोंडातून तिखट शब्दांचा मारा करणारा डोरल्या ही माझ्या इतक्या वर्षांच्या काळातील एक वेगळी भूमिका असल्याचे शशांक सांगतात.  

मनातील खंत... 
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत शशांक शेंडे यांनी एक खंत व्यक्त केली होती. ती खंत म्हणजे ते म्हणाले, की लोकांना चित्रपटांमध्ये पाहिल्यामुळे माझा चेहरा लक्षात राहतो पण मी कोण ते माहिती नसते. माझे नाव काय तेच लोकांच्या लक्षात येत नाही अशी खंत शशांक यांनी व्यक्त केली होती. 

पुढे वाचा, शाहिद कपूर स्टारर 'कमिने' चित्रपटातून पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकले शशांक... 
बातम्या आणखी आहेत...