आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX : सिद्धार्थ जाधवला दुस-यांदा कन्यारत्न प्राप्ती, बारशाला पोहोचले मराठी सेलिब्रिटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्रे - (वर) सिद्धार्थ आणि तृप्ती जाधवसह अभिनेता अनिकेत केळकर आणि त्यांची मुले, खाली डावीकडे - सिद्धार्थ आणि तृप्ती जाधव अभिेनेत्री आदिती सारंगधरसोबत, उजवीकडे - मुलगी इरा आणि अंकुश चौधरीसोबत सिद्धार्थ जाधव. - Divya Marathi
छायाचित्रे - (वर) सिद्धार्थ आणि तृप्ती जाधवसह अभिनेता अनिकेत केळकर आणि त्यांची मुले, खाली डावीकडे - सिद्धार्थ आणि तृप्ती जाधव अभिेनेत्री आदिती सारंगधरसोबत, उजवीकडे - मुलगी इरा आणि अंकुश चौधरीसोबत सिद्धार्थ जाधव.
मराठी इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव सध्या खूप खुशीत आहे. त्याच्या या आनंदाचे कारण म्हणजे त्याच्या घरी दुस-यांदा लक्ष्मीचे आगमन झाले आहे. अर्थातच सिद्धार्थला दुस-यांदा कन्यारत्न प्राप्त झाले आहे. 6 जून रोजी मुंबईत सिद्धार्थची पत्नी तृप्तीने बाळाला जन्म दिला.
नुकतेच सिद्धार्थ आणि त्याची पत्नी तृप्ती यांनी आपल्या लाडक्या लेकीचे थाटात बारसे केले. 'इरा' असे तिचे नाव ठेवण्यात आले आहे. इरा ही या दाम्पत्याची दुसरी लेक आहे. स्वरा हे त्यांच्या पहिल्या मुलीचे नाव आहे.
सिद्धार्थ आणि तृप्तीच्या लेकीला आशीर्वाद देण्यासाठी मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी बारश्याला आले होते. अभिनेता-दिग्दर्शक केदार शिंदे पत्नीसोबत पोहोचले होते. याशिवाय अंकुश चौधरी, कोरिओग्राफर उमेश जाधव, अभिनेत्री आदिती सारंगधर, अभिनेते जयवंत वाडकर यांच्यासह बरेच सेलिब्रिटी ईराच्या बारशाला आले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, इराला आशीर्वाद देण्यासाठी पोहोचलेल्या सेलिब्रिटींची खास छायाचित्रे...