आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

XCLUSIVE : मराठी SRKची FAN फॉलोविंग, कसा अडकला ‘सेल्फी’ चाहत्यांच्या गराड्यात? जाणून घ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(स्वप्नील जोशी चाहत्यांच्या गराड्यात)
लाखों चाहत्यांच्या गराड्यात सापडलेल्या बॉलीवूडच्या किंग खानची फॅन्सपासून आपली सुटका करून घेताना जी अवस्था होते. तशीच परिस्थिती नुकतीच स्वप्नील जोशीवरही आली. आपल्या फॅन्सपासून त्याला अक्षरश: पळावं लागलं.
झालं असं की, स्वप्नील आपल्या नेक्स्ट फिल्म प्रमोशनमधून वेळ काढून आपली मैत्रिण मुक्ता बर्वेचं नाटकं पाहायला आला खरा. पण नाटकं संपल्यावर नाट्यगृहात उपस्थित त्याच्या चाहत्यांनी त्याला गराडाच घातला. सुरूवातीला स्वप्नीलने चाहत्यांची ‘एक सेल्फ प्लीज’वाली रिक्वेस्ट मान्य करून फोटो काढायला सुरूवात केली खरी. पण स्वप्नील फ्रेंडली वागतोय म्हटल्यावर पाहता पाहता, चाहत्यांची त्याच्याभोवती तौबा गर्दी व्हायला सुरूवात झाली.
किंबहुना ह्या गर्दीतले काही, तर वर्तमानपत्रात स्वप्नील जोशी प्रयोगाला येणार ही जाहिरात वाचूनच खास स्वप्नीलला भेटायला मिळेल म्हणून आले होते. स्वप्नीलच्या चाहत्यांची संख्या वाढू लागल्यावर नाटकाच्या कलावंतांचा व्यवस्थित निरोपही न घेता स्वप्नीलला तिथून काढता पाय घेणं भाग पडलं. आणि मग स्वप्नीलला मराठीतला शाहरूख खान का म्हणतात, ते आजुबाजुच्या लोकांना उमगलं.
स्वप्नीलला याबद्दल विचाराल तर तो म्हणतो, “माझी शाहरूखशी तुलना करणा-यांचे मी फक्त विनयाने आभार मानीन. ब्रिटीश अभिनेत्री ऑन्ड्री हेपबर्नने म्हटल्याप्रमाणे, अभिनेत्याला त्याच्या शेवटच्या चित्रपटानेच ओळखले जाते. जर फिल्म हिट झाली असेल तर त्याला स्टार म्हणतात. आणि पडली असेल, तर तेवढीच त्याची समीक्षाही होते. हे म्हणजे क्रिकेटच्या मॅचसारखं असतं. तुम्हांला दरवेळी शुन्यापासून सुरूवात करावी लागते. चाहत्यांचे मिळणारे प्रेम आवडतंच. पण त्यामुळे मी हवेत उडतं नाही. मी स्वत:ला स्वप्नील जोशी या ब्रँडकडे नोकरीला असणारा एक कामगार समजतो. मी आजही तोच गिरगाव राहणारा मराठी मध्यमवर्गीयच आहे.”
(सर्व फोटो- प्रदिप चव्हाण)
पूढील स्लाइडमध्ये पाहा, स्वप्नीलने काढलेले सेल्फी