आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वप्निलच्या SilverScreenवरच्या Heroineने डिझाइन केली स्वप्निलच्या बायकोसाठी खणाची साडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोमध्ये - लीना स्वप्निल जोशी आणि तेजस्विनी पंडित)
हिरो-हिरोइनचं नातं जसं सिल्व्हर स्क्रिनवर दिसतं, तसंच ते इतरवेळी असतं का? हिरोच्या पत्नीला त्याच्या सिल्व्हर स्क्रिनवरच्या ग्लॅमरस हिरोइन्सबद्दल नक्की काय वाटतं असेल? त्या एकमेकींशी बोलत असतील का? की त्यांच्यात आसुयेचे नाते असते? असे अनेक प्रश्न नेहमी फॅन्सच्या मनात असतात. आणि ह्याचच उत्तर अभिनेत्री तेजस्विनी पंडितने स्वप्निल जोशीच्या बायकोसाठी डिझाइन केलेल्या साडीत लपलंय.
तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावेचा डिझाइनर ब्रॅन्ड आहे, ‘तेजाज्ञा’. डिझाइनर साड्यांचा हा ब्रँड आहे. तेजस्विनी पंडित 'तूहिरे' चित्रपटात स्वप्निल जोशीची हिरोइन होती. त्यावेळी त्यांची छान मैत्री झाली. आणि आता आपल्या ह्या मैत्रिणीलाच स्वप्निलने त्याच्या दिवाळी पाडव्याला लीनाला गिफ्ट देण्यासाठी एक छान डिझाइनर साडी बनवायला सांगितलं.
ह्या गोष्टीला दूजोरा देताना स्वप्निलची बायको लीना म्हणते, “ तेजुने डिझाइन केलेली ही साडी आणि मी घातलेली ही एक दानी मोहनमाळ हे माझे पाडवा गिफ्ट आहे. मला हव्या स्टाइलचे डिझाइन आणि हव्या त्या रंगाची साडी खास तेजुच्या ह्या ‘तेजाज्ञा’ ब्रँन्डकडनं मी डिझाइन करवून घेतलीय.”
तेजस्विनी पंडित सांगते, “ माझ्या ब्रॅन्डचा युनिकनेस हा आहे की, एकदा एका रंगाची एका स्टाइलची साडी डिझाइन केली, की ती स्टाइल आणि रंग आम्ही पून्हा रिपीट करत नाही. दूसरी गोष्ट म्हणजे, खणाचे ब्लाउज आपल्याला माहित आहेत. पण खणाच्या साड्या कोणी बनवत नाहीत. मी खणाच्या साड्या डिझाइन करते. ती माझी स्पेशालिटी आहे, असं म्हटलंस तरी चालेल. पूर्वीच्या बायका परकर-पोलका घालायच्या. त्यात पोलकं खणाचा असायचा. त्याचे सौंदर्य वेगळंच होतं. तो खण पून्हा एकदा फॅशनमध्ये आणावा, म्हणून ही सुरूवात केली.”
ती पूढे म्हणते, "कुठलीही स्त्री साडीत सुंदर दिसते. मराठीत असा प्रकार कोणी आणलेला नाही. ह्याचे स्टोअर्स पुढच्यावर्षी ओपन करण्याचा विचार आहे. सध्या आमची वेबसाइट सुरू केलेली आहे. हर्षदा खानविलकर, स्मिता तांबे अशा माझ्या फिल्म इंडस्ट्रीतल्या अनेक मैत्रिणींनी माझ्याकडून साड्या घेतलेल्याच आहेत.”
पुढील स्लाइ़मध्ये पाहा, खणाच्या साड्यांमध्ये तेजस्विनी पंडितचं खुललेलं सौंदर्य