आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वप्नीलचे हटके B'day सेलिब्रेशन, वाढदिवशी केला मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: मराठीतील सुपरस्टार स्वप्नील जोशीने नुकतीच वयाची 38 वर्षे पूर्ण केली. मंगळवारी म्हणजेच 18 ऑक्टोबर रोजी त्याचा वाढदिवस होता. स्वप्नीलसाठी यंदाचा वाढदिवस अतिशय स्पेशल ठरला. वाढदिवशीच त्याच्या आगामी 'फुगे' या सिनेमाचा टीजर लाँच झाला. सेलिब्रिटी फ्रेंड्ससोबत त्याने बर्थडे सेलिब्रेशन केले. विशेष म्हणजे खास दिवशी स्वप्नीलने एक संकल्प केलाय आणि तो म्हणजे अवयव दानाचा संकल्प. वाढदिवसाच्या निमित्ताने स्वप्नीलने मरणोत्तर अवयवदानाचे संमतीपत्र भरुन दिले. ज्यानुसार तो मृत्यूनंतर फुफ्फुस, मुत्रपिंड आणि स्वादुपिंड दान करणार आहे.
स्वप्नील जोशी याच्या आगामी ‘फुगे’ सिनेमाचा एक कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी त्याने या बातमीला दुजोरा दिला आहे. त्यासोबतच त्याने अवयव दानाचे संमतीपत्रही सोशल मीडियात शेअर केले आहे. त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. याआधीही चित्रपटसृष्टीमध्ये काही कलाकारांनी मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प केला आहे.

स्वप्नील लवकरच ‘फुगे’ सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सुबोध भावे आणि स्वप्नील जोशी यांच्या मुख्य भूमिका या सिनेमात दोघेही पहिल्यांदा एकत्र येत आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन स्वप्ना जोशी-वाघमारे यांनी केले आहे. मनोरंजनाने परिपूर्ण असलेल्या हा सिनेमा 2 डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होतोय.
बातम्या आणखी आहेत...