Home »Bollywood »Marathi Cinekatta» Marathi Actor Upendra Limaye Interview On Nagarsevak Ek Nayak

एक्सपिरिमेंटल आर्टिस्ट असा शिक्का मला मारुन घ्यायचा नाही - उपेंद्र लिमये

समीर परांजपे | Mar 17, 2017, 00:40 AM IST

एक्सपिरिमेंटल आर्टिस्टचा शिक्का मला माझ्यावर कधीच बसू द्यायचा नाहीये. त्यामुळे मी `नगरसेवक एक नायक' सारखा एकदम व्यावसायिक मराठी चित्रपट स्वीकारला असे उपेंद्र लिमये याने divyamarathi.com ला सांगितले.

उपेंद्र नायकाच्या भूमिकेत असलेला `नगरसेवक एक नायक' हा चित्रपट येत्या 31मार्च रोजी झळकत आहे. उपेंद्र लिमये म्हटले की आठवतात 'जोगवा', 'यलो'सारखे आगळेवेगळे चित्रपट. divyamarathi.com सोबत दिलखुलास गप्पा मारताना उपेंद्रने सांगितले की, माझी भूमिका असलेल्या चित्रपटांपैकी 10 ते 12 चित्रपटांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेला आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांत मी `बऱ्यापैकी' काम केले असावे असे समजायला हरकत नाही!
जोगवा, सावरखेड एक गाव अशा मराठी तसेच काही हिंदी चित्रपटांतून माझ्या भूमिका तुम्ही पाहिल्यात तर त्याला एक सामाजिक अस्तर होते. त्यामुळे एखादा चळवळीतला कार्यकर्ता असावा अशा पद्धतीने माझ्या भूमिका वाटू लागल्या होत्या. मी एक व्यावसायिक कलाकार आहे. मला कोणत्याच साच्यात अडकणे आवडणार नाही. त्यामुळे मी नगरसेवक एक नायक हा चित्रपट स्वीकारला तसेच तब्बल साडेनऊ वर्षांनी मी मराठी मालिकेत काम करीत आहेत. ती म्हणजे सध्या स्टार प्रवाहवर लोकप्रिय झालेली 'नकुशी' ही मालिका.

'नगरसेवक एक नायक'मध्ये मी मल्हार शिंदे या नायकाची भूमिका करतो आहे. माझ्या सोबत नायिका म्हणून नेहा पेंडसे आहे. तिच्या बरोबर मी पहिल्यांदाच काम करीत आहे. चित्रपटादरम्यान आमची केमेस्ट्री छान जुळली आहे. ती तुम्हाला 31मार्चला पडद्यावर बघता येईलच.

माझ्या आगामी प्रोजेक्टसबद्दल सांगायचे तर 'शेंटिमेंटल' नावाचा चित्रपट मी करतोय. त्यात माझ्याबरोबर अशोक सराफ, रघुवीर यादवही असणार आहेत. आम्ही तिघे प्रथमच एकत्र काम करतोय. त्याचबरोबर 'सूरसपाटा', 'क्षितीज' असे माझे काही आगामी मराठी चित्रपट झळकणार आहेत. त्याशिवाय काही हिंदी चित्रपटही आहेत. त्यांची माहिती मी योग्यवेळी देईनच.
पुढील स्लाईड्सवर बघा, 'नगरसेवक एक नायक' या सिनेमाचे काही स्टिल्स...

Next Article

Recommended