आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Marathi Actors Like Nilesh Sabale, Swapnil JoshiAnd Many More Actors Wife Profession

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निलेश, स्वप्नीलच्या पत्नी आहेत डॉक्टर, जाणून घ्या मराठी Celebsच्या वर्किंग पत्नींविषयी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक "स्त्री " असते असे म्हटले जाते. अनेक यशस्वी पुरुषांच्या पाठीशी ढाल बनून त्यांची पत्नी उभी राहिल्यानेच यशस्वी व्यक्ती जीवनात काहीतरी करू शकल्या आहेत. विशेष म्हणजे आजची स्त्री पत्नी बनून फक्त पतीने दिलेल्या सुख-सुविधांचा लाभ न घेता प्रत्येक सुख-सुविधा मिळविण्यात बरोबरीने हातभार लावू लागली आहे. संघर्ष करू लागली आहे. अनेक स्त्रिया उच्चशिक्षण घेऊन मोठ्या हुद्द्यांवर कार्यरत आहेत.
मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकारांच्या पत्नींनीसुद्धा त्यांच्या संघर्षात त्यांना मोलाची साथ दिली आहे. त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहत असतानाच त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळखसुद्धा निर्माण केली आहे. 'चला हवा येऊ द्या' फेम निलेश साबळेची पत्नी गौरी साबळे ही एक डॉक्टर असल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. शिवाय मराठीचा आघाडीचा अभिनेता स्वप्नील जोशी याची पत्नी लीनासुद्धा एक डेंटिस्ट आहे.
निलेश आणि स्वप्नीलप्रमाणेच मराठीतील अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांच्या पत्नींनी आपापल्या कार्यक्षेत्रात स्वतःचे एक वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे.
या पॅकेजमधून आज आम्ही तुम्हाला मराठी फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांच्या पत्नी कोणत्या क्षेत्रात आपले करिअर करत आहेत, ते सांगत आहोत...