आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॅपी बर्थडे अमृता! बर्थडे गर्लचे हे PHOTOS बघून तुम्हीही म्हणाल इट्स सो हॉट...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः मराठी इंडस्ट्रीतील गॉर्जिअस अभिनेत्री अमृता खानविलकर हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 32 वर्षे पूर्ण केली आहेत. 23 नोव्हेंबर 1984 रोजी तिचा जन्म झाला. अमृताचे शालेय शिक्षण पुण्याच्या कर्नाटक हायस्कूल येथे झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयात झाले. अमृताने मराठीसोबतच हिंदी सिनेमांमध्येही अभिनय केला आहे. शिवाय मराठी टेलिव्हिजनवर काही कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालनही केले आहे. अमृताला एक थोरली बहीण आहे. दोन वर्षांपूर्वी अभिनेता हिमांशू मल्होत्रासोबत अमृताचे लग्न झाले. लग्नानंतरही अमृताने काम सुरु ठेवले आहे. अलीकडचे तिची महत्त्वाची भूमिका असलेला 'वन वे तिकीट' हा सिनेमा रिलीज झाला होता.

मराठीतील देखण्या अभिनेत्रींपैकी अमृता एक आहे. साडीत ती जेवढी सोज्वळ दिसते तितकीच वेस्टर्न आउटफिटमध्ये चाहत्यांना हॉट वाटते. इंडियन आणि वेस्टर्न असे दोन्ही आउटफिट ती उत्कृष्टरित्या कॅरी करते. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला दाखवत आहोत, अमृताची ग्लॅमरस झलक दाखवणारी खास छायाचित्रे... अमृताच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नजर टाकली असता तिची दिलखेचक छायाचित्रे बघायला मिळतात.
चला तर मग वेळ न दवडता बघा, बर्थडे गर्ल अमृताची खास छायाचित्रे जी बघून तुमच्या तोंडून निघेल केवळ हेच शब्द इट्स सो हॉट...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...