आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Family Photos:मध्यमवर्गीय कुटुंबात झाला अमृताचा जन्म, घेतले नाही नृत्याचे पारंपारिक शिक्षण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर आज तिचा 32 वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. मुंबईत एका मध्यमवर्गीय घरात अमृताचा जन्म झाला. 23 नोव्हेंबर 1984 साली जन्मलेल्या अमृताच्या आईवडिलांचे नाव राजू आणि गौरी खानविलकर असे आहे. 

 

अमृताचे शिक्षण कर्नाटक हायस्कुल तर महाविद्यालयीन शिक्षण मराठवाडा हायस्कुल येथे पूर्ण झाले. अमृताच्या घरात कोणीही मराठी सिनेइंडस्ट्रीशळी संबंधित नाही पण अमृताला लहानपणापासूनच नृत्य आणि अभिनयाची आवड होती आणि त्याच ध्यासापोटी अमृता मुंबईत पोहोचली. 2004 साली अमृताने इंडियाज् बेस्ट सिनेस्टार की खोज या कार्यक्रमात भाग घेतला आणि तिथून तिच्या फिल्मी करीअरला सुरुवात झाली. अमृताने 'गोलमाल' या तिच्या पहिल्या हिंदी चित्रपटात डबलरोल साकारला होता. त्यानंतर तिने मराठीनंतर हिंदीतही तिचे करिअर आजमावले आणि 'मुंबई सालसा' या पहिल्या बॉलिवूड चित्रपटात अभिनय केला. त्यानंतर फुंक, हॅट्रीक, कॉन्ट्रॅक्ट, फुंक 2, हिम्मतवाला आणि आता तिचा राजी हा चित्रपट आलिया भट्टसोबत येणार आहे. 

 

कोणीही गॉडफादर नसताना अमृताने तिच्या बळावर हे यश निर्माण केले आहे त्याबाबत तिच्या आईवडीलांना फार अभिमान आहे. अमृता तिच्या कामाच्या वेळेतून आपल्या फॅमिलीबरोबरही वेळ घालवायला विसरत नाही. अमृता आईच्या सर्वात जास्त क्लोज आहे आणि नेहमीच तिच्यासोबत देश-विदेशात व्हॅकेशनवर जात असते. अमृताला एक सख्खी बहीण आहे तिचे नाव आहे आदिती खानविलकर. अमृता तिच्यासोबतनही नेहमीच फोटो शेअर करत असते. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अमृताचे तिच्या फॅमिलीसोबतचे काही खास PHOTOS...

 

 

 

बातम्या आणखी आहेत...