आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day : ही आहे मराठमोळ्या अश्विनी भावेची फॅमिली, असा झाला मुंबई ते अमेरिकेपर्यंतचा प्रवास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अश्विनी भावे पती किशोर बोपर्डीकर आणि दोन्ही मुलांसोबत दिसतेय. - Divya Marathi
अश्विनी भावे पती किशोर बोपर्डीकर आणि दोन्ही मुलांसोबत दिसतेय.
अश्विनी भावे... मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव. 6 मे 1972 रोजी भावे या मराठी कुटुंबात या अष्टपैलु अभिनेत्रीचा जन्म झाला. 1987 साली ’राजलक्ष्मी’ या सिनेमातून तिने आपल्या करियला सुरुवात केली. ’किस बाई किस’, ’अशी ही बनवाबनवी’, ’कळत नकळत’, ’झुंज तुझी माझी’, ’वजीर’ यांसारखे गाजलेले सिनेमे तिने केले. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही इंडस्ट्रीत दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. तसेच अनेक नाटकांमध्येदेखील तिने काम केले आहे. 
 
हिंदी सिनेसृष्टीतील प्रवास... 
1991 साली ’हिना’ या सिनेमातून अश्विनीने हिंदी सिनेसृष्टीत प्रवेश केला. लहानपणापासून ’ऋषी कपूर’ची फॅन राहिलेल्या अश्विनीची त्यांच्यासोबत स्क्रिन स्पेस शेअर करण्याची इच्छा होती, ती  इच्छा ’हिना’ सिनेमाद्वारे पूर्ण झाली. आपल्या या आवडत्या अभिनेत्याबरोबर तिने ’हनिमून’ आणि ’मुहब्बत की आरझू’सारखे आणखी काही चित्रपट केले. ’अशान्‍त’, ’सैनिक’, ’जखमी दिल’, 'मीरा का मोहन', 'परंपरा', 'कायदा कानून', 'चौराह', 'इक्का राजा रानी', 'वापसी साजन की',  'युगपुरुष' या सिनेमांमधून तिने स्वतःची वेगळी छाप उमटवली.  

अश्विनी भावेच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊयात, तिच्या मुंबई ते अमेरिकेपर्यंतचा प्रवासासह बरेच काही... 
 
 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...