आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अश्विनी भावेंनी परदेशी साजरा केला इको-फ्रेंडली गणेशोत्सव, बाप्पासाठी स्वतः बनवले मोदक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी भावे अमेरिकेत स्थायिक आहेत. परदेशी वास्तव्याला असूनदेखील तिथे त्या आपल्या कुटुंबीयांसोबत भारतीय सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. अमेरिकेतील घरी त्यांनी पती आणि मुलांसोबत इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा केला आहे. यावर्षी त्यांनी घरीच गणरायाची मुर्ती रंगवली. एका मुलाखतीत अश्विनी भावे म्हणाल्या, यावर्षी माझी मुलगी साचीने घरीच गणपतीची मुर्ती रंगवण्याची कल्पना मांडली. तिनेच मला मुर्तीला शेडिंग, हायलाइट्स कसे करावे, हे शिकवले. तिने खूप सुंदर अशी मुर्ती रंगवली. 
 
बाप्पासाठी नैवेद्य...
अश्विनी म्हणाल्या, गणेशोत्सवाच्या काळात घरीच मोदक बनवण्यावर माझा भर असतो. यंदादेखील मी स्वतः उकडीचे मोदक तयार केले आहेत. शिवाय बटाट्याची भाजी, मटकीची उसळ आणि पुरी असा नैवेद्य बाप्पासाठी तयार केला.

बालपणींच्या आठवणींना उजाळा 
बालपणीच्या गणेशोत्सवाच्या आठवणींना उजाळा देताना त्या म्हणाल्या, बालपणी माझ्या आजोबांच्या घरी गणेशोत्सव साजरा होत असे. मुंबईतील भिवंडीच्या घरी मी गणेशोत्सवाच्या काळात आजोबांच्या घरी तीन दिवस राहायला जात असे. घरी जे मोदक तयार होत असे त्यापैकी एक मोदक आम्ही मिठाचा बनवायचो. जो कुणी तो मोदक खायचा त्याचा चेहरा बघण्यासारखा असायचा. शिवाय बालपणी आम्ही अनेक गणेश मंडळांना भेटी द्यायचो. तेथील देखावे बघणे ही आमच्यासाठी मेजवानी असायची.  

मोदक खायला आवडत नाहीत..
अश्विनी म्हणाल्या, मला उकडीचे मोदक बनवायला आवडतात. पण ते खायला विशेष आवडत नाही. 

बघा, अश्विनी भावे यांच्या घरच्या गणेशोत्सवाची छायाचित्रे.. 
बातम्या आणखी आहेत...