एन्टरटेन्मेंट डेस्कः पुढचं पाऊल या मालिकेत ''आक्कासाहेब'' या कणखर स्त्रीच्या व्यक्तिरेखेतून घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 43 वर्षे पूर्ण केली आहेत. कसे आहे हर्षदा खानविलकर यांचे खासगी आयुष्य, कसा मिळाला त्यांना अभिनयाचा पहिला ब्रेक, का त्यांना लॉचे शिक्षण अर्धवट सोडावे लागले, यासह हर्षदा यांच्याविषयीच्या खास गोष्टी आम्ही त्यांच्या चाहत्यांसाठी घेऊन आलो आहोत.
मुंबईत झाला जन्म...
अभिनय क्षेत्राची कुठलीही परंपरा नसलेल्या व एका मध्यमवर्गीय कुटुंबातील 2 जुलै 1973 रोजी हर्षदा यांचा जन्म झाला. त्यांची जॉईंट फॅमिली होती. आईवडील धाकटी बहीण, काका-काकू, आत्या यांसह एकत्र कुटुंबपद्धतीत हर्षदा लहानाच्या मोठ्या झाल्या. हर्षदा यांचे वडील दिलीप कुमार आणि सुनील गावस्करांचे मोठे फॅन होते. मुंबईतील किंग जॉर्ज या शाळेत त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. पुढे किर्ती कॉलेजमधून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. बालपण खूप आनंदात आणि सुखात गेल्याचे हर्षदा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
पुढे वाचा, हर्षदा यांना लॉ कॉलेजमधून का काढून टाकण्यात आले होते...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)