आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'रामायणा\'त कौशल्येची नव्हे हवी होती कैकयीची भूमिका, वाचा जयश्री गडकर यांच्याविषयी सर्वकाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः  अप्रतिम सौंदर्य, अद्वितीय अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर पाच दशकं अधिराज्य गाजवणा-या अभिनेत्री जयश्री गडकर यांची 29 ऑगस्ट रोजी नववी पुण्यतिथी होती. 21 मार्च 1942 रोजी कारवार जिल्ह्यातल्या सदाशिवगड या गावी एका सामान्य कोकणी कुटुंबात जयश्री गडकर यांचा जन्म झाला होता. मूळच्या मीना, नंतर जया, जयश्री या नावाने त्या ओळखल्या जाऊ लागल्या. त्या पाच वर्षांच्या असतानाच त्यांचे कुटुंब मुंबईला आल्यामुळे त्यांचे पुढचे शिक्षण मुंबईला झाले. कॉलेज शिक्षण मात्र त्यांचे झाले नाही. नृत्य-गायनाची आवड असल्यामुळे कलाक्षेत्राकडे त्यांचा विशेष ओढा होता. लहान असताना चोरून सिनेमा पाहिल्याच्या आठवणी जयश्री गडकर यांनी त्यांच्या अशी मी जयश्री या आत्मचरित्रात सांगितल्या आहेत. बालपणीच त्यांचे नृत्याचे शिक्षण सुरू झाले. त्या गोपीकृष्णांकडून कथ्थक शिकल्या. पुढे त्यांनी गाण्याचेही धडे घेतले.  

जयश्री गडकर यांचा  सिनेसृष्टीतील प्रवास कसा झाला,  'रामायणा'त त्यांना का करायची होती कैकयीची भूमिका, 'रामायणा'त 'दशरथा'ची भूमिका साकारणारे बाळ धुरी होते जयश्री गडकर यांचे ख-या आयुष्यातील जोडीदार, यासह बरंच काही वाचा त्यांच्याविषयी पुढील स्लाईड्सवर... 
बातम्या आणखी आहेत...