आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पुढचं पाऊल’ फेम जुई गडकरीला जीवे मारण्याची धमकी, वाढदिवशीच आले धमकीचे पत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या जुई गडकरी आहे, चिंतेत
मालिका म्हटलं की सासू-सूनेची कट-कारस्थानं तर आलीच. मग कधी सासू, कधी नणंद तर कधी भावजय ही त्या साध्या भोळ्या सूनेच्या जीवावर सदोदित उठलेली असते. आणि तिला मारण्याचे अनेक प्लॅन्स बनवतं असते. ‘पुढचं पाऊल’ मधल्या साध्या सरळमार्गी कल्याणीच्याही जीवाला सध्या धोका आहे. पण मालिकेमध्ये नाही तर ख-या आयुष्यात.
‘पुढचं पाऊल’ फेम अभिनेत्री जुई गडकरी आणि तिचे घरचे सध्या खूप चिंतेत आहेत. याचं कारण आहे, तिच्या घरी तिच्या वाढदिवसाच्याच दिवशी तिला जीवे मारण्याची धमकी आली. वाढदिवसाला खरं तर अभिनेत्रींना त्यांचे चाहते रक्ताने वगैरे पत्र लिहीण्याची रोमॅंटिक प्रथा आजपर्यंत चालत आलेली आहे. पण इथेतर जिचा वाढदिवस आहे, त्या अभिनेत्रीचाच रक्तपात होण्याचं पत्र तिच्या घरी पोहोचल्याची अजब गोष्ट घडलीय.
जुई गडकरीचा वाढदिवस ८ जुलैला असतो. आणि यंदाही तिच्या घरी त्यादिवशी मस्त सेलिब्रेशन सुरू असतानाच एक छोटा रक्तबंबाळ झालेला मुलगा दोन पत्र घेऊन जुईच्या दारी आला. त्याने ते पत्र जुईच्या काकांना दिले आणि तो पळून गेला.
'ज्या मुलाने हे पत्र दिले, त्याला आणि जुईला आम्ही लवकरच जीवानिशी मारणार' असल्याचं या पत्रात लिहीले होतं. ते पाहून जुईचे घरचे फारच घाबरले. खरं तर, 'ह्याविषयी कुठेही वाच्यता केल्यास घरातल्या सगळ्यांनाच मारू' अशी धमकीही पत्रात देण्यात आलीय. तरीही जुईच्या घरच्यांनी काळजीने ह्याविषयी पोलिसांमध्ये तक्रार केलीय. पण तक्रारीनंतर खरं तर, जुईला लगेच पोलिस प्रोटेक्शन देणे आवश्यक असूनही जुईला पोलिसांनी अद्याप पोलिस संरक्षण दिले नाही.
जुईला यासंदर्भात विचारल्यावर ती म्हणाली, “ पोलिसांचा सध्या याविषयीचा तपास चालू आहे. त्या पत्रानंतर घरचे सध्या खूप काळजीत आहेत. ही कोणाची थट्टा होती की, कोणाला मला खरंच मारायचंय, याबद्दलचा अद्याप काहीच थांगपत्ता लागलेला नाही. पण मला शुटिंग बंद करून घरी बसणे शक्य नाही. त्यामुळे सध्या कधी बाबा तर कधी भाऊ माझ्यासोबत असतो. आम्ही आशा करतोय, की ते निनावी पत्र पाठवणारी जी कोणी व्यक्ती आहे, ती लवकरात लवकर पोलिसांच्या ताब्यात सापडो.”
मनसे किंवा शिवसेना किंवा तत्सम कोणत्या पक्ष किंवा समाजसेवा संस्थेची या संदर्भात मदत घेतली आहे का, असे विचारल्यावर जुई म्हणाली, “नाही, सध्या तरी मी या संदर्भात कोणाशीच जास्त बोलले नाही. माझ्या घरच्यांना आणि माझ्या मालिकेच्या सहकलाकारांना यासंदर्भात माहित आहे. घरचे तर माझी काळजी घेत आहेतच. पण त्याचप्रमाणे मालिकेचे अख्खे युनिट माझी काळजी घेत आहेत. त्यामुळेच तर सध्या मालिकेच्या सेटवर आम्ही चाहत्यांनाही येऊ देत नाही आहोत.”
पुढील पानावर वाचा, जुई गडकरीला आलेले धमकीचे पत्र आणि त्यापुढील स्लाईड्समध्ये पाहा 'पुढचं पाऊल' मालिकेतील जुईचे फोटो...