आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​ ही चिमुकली आता आहे मराठी इंडस्ट्रीतील टॅलेंटेड अॅक्ट्रेस, आज सेलिब्रेट करतेय 23 वा B'day

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरील छायाचित्रात दिसणा-या या चिमुकलीला तुम्ही ओळकलंत का... गायिका म्हणून ती तुमच्या परिचयाची आहेच, मात्र गायिकेसोबतच ती एक उत्कृष्ट अभिनेत्रीसुद्धा आहे. आम्ही बोलतोय ते केतकी माटेगावकर हिच्याविषयी... केतकीचे बालपणीचे रुप जेवढे लोभसवाणे आहे, तारुण्यात पदार्पण केल्यानंतर ती तेवढीच सुंदर दिसते. आज केतकीचा वाढदिवस असून तिने वयाची 23 वर्षे पूर्ण केली आहेत. 
 
मुळची नागपूरची आहे केतकी
केतकी माटेगावकरचा जन्म 22 फेब्रुवारी 1994 नागपूर येथे झाला. ‘टाइमपास’, ‘शाळा’, ‘काकस्पर्श’सारख्या सिनेमांतून केतकी सगळ्यांच्याच परिचयाची झाली आहे. पण मुळात नायिका होण्याआधी ती गायिका आहे. ‘सारेगमप लिटल चॅम्प’मध्ये ती सहभागी झाली होती. त्यानंतर अभिनयाच्या क्षेत्रात ती आली. ‘शाळा’ या सिनेमातून तिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘आरोही’, ‘काकस्पर्श’ आणि ‘तानी’ या सिनेमांमधून भूमिका केल्या. ‘काकस्पर्श’ या सिनेमातील भूमिकेसाठी ‘मिफ्ता अवॉर्ड्स 2012’मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार तिला मिळाला, तर ‘शाळा’ सिनेमातील भूमिकेसाठी ती ‘फिल्मफेअर अवॉर्ड’ची मानकरी ठरली. ‘टाइमपास’ या सिनेमातील तिने साकारलेली भूमिकाही गाजली.  
 

केतकीच्या गायन आणि अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यानेही चाहत्यांना भुरळ घातली. आज तिच्या वाढदिवसाचे औचित्य साधत तिचे बालपणीपासून ते आत्ताचे लेटेस्ट फोटोज आम्ही आज तुम्हाला या पॅकेजच्या माध्यमातून दाखवणार आहोत.
 
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, केतकीची खास छायाचित्रे... 
बातम्या आणखी आहेत...