आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day Spl: या ग्लॅमरस अॅक्ट्रेसने पूर्ण केली वयाची पस्तीशी, याचवर्षी अडकली लग्नाच्या बेडीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
‘चुकभूल द्यावी घ्यावी’ या मालिकेतून निर्मिती क्षेत्रात उतरलेली अभिनेत्री मनवा नाईक हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची पस्तीशी पूर्ण केली आहे. 8 सप्टेंबर 1982 रोजी प्रसिद्ध अभिनेत्री मीना नाईक आणि अरुण नाईक यांच्या घरी मनवाचा जन्म झाला. मनवा अभिनेत्रीसोबतच निर्माती आणि दिग्दर्शिकासुद्धा आहे.
 
‘क्षणभर विश्रांती’, ‘शहाणपण देगा देवा’, ‘दम असेल तर’, ‘काकस्पर्श’, ‘नो एंट्री पुढे धोका आहे’, ‘कँडल मार्च’, ‘पिंडदान’ तसेच मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘जाऊ द्या ना बाळासाहेब’ या चित्रपटात मनवा नाईकने लक्षवेधी भूमिका साकारली होती. 

याचवर्षी लग्नाच्या बेडीत अडकली मनवा... 
मनवासाठी यंदाचा वाढदिवस अतिशय खास आहे. कारण लग्नानंतरचा तिचा हा पहिला वाढदिवस आहे. याचवर्षी मार्च महिन्यात तिचे लग्न झाले. निर्माता सुशांत तुंगारेची मनवाने जोडीदाराच्या रुपात निवड केली. अतिशय धुमधडाक्यात दोघांचे शुभमंगल झाले. त्यांच्या लग्नाला मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. श्रेया बुगडे, नीना कुलकर्णी, सुकन्या मोने, आदिती सारंगधर, अमृता संत यांच्यासह अनेक जण मनवा आणि सुशांतला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा द्यायला पोहोचले होते. 

प्रसिद्ध निर्माता आहे सुशांत तुंगारे.. 
मनवाच्या जोडीदार सुशांत तुंगारे हा निर्माता असून, अनेक मालिकांची निर्मिती त्याने केली आहे. ‘चुकभूल द्यावी घ्यावी’ ही मालिका मनवा नाईक आणि सुशांत तुंगारे यांची निर्मिती होती. ‘सरस्वती’ या मालिकेची निर्मितीदेखील सुशांत तुंगारे यांचीच आहे. 

मनवाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पाहुयात, मनवा आणि सुशांतच्या लग्नाचे खास फोटोज...  
बातम्या आणखी आहेत...