Home »Bollywood »Marathi Cinekatta» Marathi Actress Manava Naik Mehandi Ceremony And Pre Wedding Bash

मनवा नाईक थाटतेय लग्न, वाचा कुणासोबत चढतेय बोहल्यावर आणि बघा प्री वेडिंग बॅशचे Photos

दिव्य मराठी वेब टीम | Mar 16, 2017, 17:23 PM IST

मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री मनवा नाईक लवकरच लग्नगाठीत अडकणार असून तिच्या लग्नविधींना सुरुवात झाली आहे. नुकतीच मनवाची मेंदी सेरेमनी पार पडली. मेंदी सेरमनीसोबतच मनवासाठी प्री वेडिंग बॅशचे आयोजन तिच्या मैत्रिणींनी केले होते. क्षिती जोग, क्रांती रेडकर, चिन्मयी सुमीत यांच्यासह मराठी इंडस्ट्रीतील अनेक जणी मनवाच्या प्री वेडिंग बॅशमध्ये सहभागी झाल्या होत्या. 

कुणासोबत मनवा चढणारेय बोहल्यावर...  
सुशांत तुंगारे हे मनवाच्या होणा-या नव-याचे नाव आहे. सुशांत निर्माता असून अनेक मालिकांची निर्मिती त्याने केली आहे. सध्या छोट्या पडद्यावर सुरु असलेल्या चुकभूल द्यावी घ्यावी ही मालिका मनवा नाईक आणि सुशांत तुंगारे यांची निर्मिती आहे. 'सरस्वती' या मालिकेची निर्मितीदेखील सुशांत तुंगारे यांचीच आहे. 
 
अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती आहे मनवा...
मनवा ही प्रसिद्ध अभिनेत्री मीना नाईक आणि अरुण नाईक यांची कन्या आहे. छोट्या आणि मोठ्या पडद्यावर ती कार्यरत आहे. हिंदीत तिची तीन बहुरानियाँ ही मालिका गाजली होती. तर मराठीतही तिने अनेक मालिका केल्या आहेत. याशिवाय 2014 मध्ये 'पोरबाजार' हा सिनेमा दिग्दर्शित करून सिनेदिग्दर्शनामध्ये देखील पाऊल ठेवले. तर चुकभूल द्यावी घ्यावी या मालिकेची निर्मिती तिची आणि सुशांत तुंगारे यांची आहे. 

मनवाचे गाजलेले सिनेमे
2008 - जोधा अकबर (हिंदी चित्रपट)
2010 - क्षणभर विश्रांती (मराठी चित्रपट)
2011 - शहाणपण देगा देवा (मराठी चित्रपट)
2012 - दम असेल तर (मराठी चित्रपट)
2012 - काकस्पर्श (मराठी चित्रपट)
2012- नो एंट्री पुढे धोका आहे (मराठी चित्रपट)
2014 - कँडल मार्च (मराठी चित्रपट)
2016 - पिंडदान (मराठी चित्रपट)
2016 - जाऊ द्यांना बाळासाहेब (मराठी चित्रपट)

पुढील स्लाईड्सवर बघा, मनवा नाईकच्या मेंदी सेरेमनी आणि प्री वेडिंग बॅशचे खास Photos... 

Next Article

Recommended