एन्टरटेन्मेंट डेस्कः मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सिंग क्वीन म्हणून ओळखली जाणारी मानसी नाईक हिने अलीकडेच एक हॉट फोटोशूट केले आहे. पावसात चिंब भिजताना तिने हे फोटोशूट केले आहे. स्टार अॅम्बेसेडर या सिने मॅगझिनच्या कव्हर पेजवर मानसीचा हा हॉट अंदाज बघायला मिळणारेय.
या मॅगझिनची यंदाची थिम ही पाऊस हा होती. मात्र या फोटोशूटसाठी खोटा पाऊस पाडण्यात आला होता. या पावसात भिजताना मानसी नाईकच्या घायाळ अदा फोटोग्राफर नंदू धुरंधर यांनी आपल्या कॅमे-यात बंदिस्त केल्या आहेत. ऑरेंज कलरच्या साडीत चिंब भिजलेली मानसी अतिशय सुंदर दिसत आहे. स्टार अॅम्बेसेडरच्या युट्यूब चॅनलवर या फोटोशूटच्या मेकिंगचा व्हिडिओ अपलोड करण्यात आला असून तो मोठ्या प्रमाणात बघितला जातोय. या मेकिंग व्हिडिओमध्ये मानसीने तिच्या पावसाळ्यातील आठवणींनासुद्धा उजाळा दिला आहे.
काय म्हणतेय मानसी हे जाणून घेण्यासाठी शेवटच्या स्लाईडवरचा व्हिडिओ बघायला विसरु नका. चला पाहुयात, साडीत चिंब भिजलेल्या मानसीच्या घायाळ करणा-या अदा...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)