आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'खुलता कळी खुलेना' फेम मयुरी म्हणते, 'आता कामं संपली....फोटो पोस्ट करायला मोकळी!!'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'खुलता कळी खुलेना' या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री मयुरी देशमुख ही मालिका संपल्यानंतर आता नेमकी कुठे बिझी आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का? मयुरी अलीकडेच बारामतीमध्ये होती. निमित्त होते, मयुरीच्या दादाच्या लग्नाचे. नोव्हेंबर महिन्यात मयुरीचा नात्यातील एक भाऊ विवाहबद्ध झाला. बारामतीत हा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाचे काही फोटोज मयुरीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहेत. हळदीच्या दिवसाचा एक फोटो पोस्ट करुन मयुरीने लिहिले, "आता कामं संपली....फोटो पोस्ट करायला मोकळी!!😀 Posting my Haldi look!!!"  #dadachalagna #majja #haldi @ Baramati हे हॅशटॅगसुद्धा मयुरीने या फोटोसोबत टाकले आहेत. 

 

याशिवाय धाकटा भाऊ अनुप देशमुखसोबतचा एक फोटो पोस्ट करुन मयुरी लिहिले, "My partner in crime for Sangeet , my co anchor , my lil brother, my partner in crime since childhood!! Media has given u a new name - Chote #dadachalagna #sangeetnight #whatanight #supermemories" मयुरीने तिच्या दादाच्या लग्नसमारंभातील संगीत, मेहंदी या विविध कार्यक्रमांवेळचेही फोटो शेअर केले आहेत.

 

मयुरी लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. अभिनेता शशांक केतकरसोबत तिचा नवीन चित्रपट येऊ घातला असून अद्याप या चित्रपटाचे शीर्षक गुलदस्त्यात आहे. पण चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.  


पाहुयात, मयुरीने शेअर केलेले फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...