आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजिंक्य देवची ही गोड अभिनेत्री आठवतेय?, एकाच फिल्मनंतर झाली होती सिनेसृष्टीतून गायब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी चित्रपट 'माझं घर माझा संसार' (1986) या चित्रपटातील अजिंक्य देवची देखणी अभिनेत्री मुग्धा चिटणीसने या केवळ एकाच चित्रपटात काम केले होते. या एकच चित्रपटाने मुग्धाने तिच्या सहजसाध्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती. चित्रपटातील 'दृष्ट लागण्याजोगे सारे' हे गाणे फारच लोकप्रिय झाले होते. 
 
ही अभिनेत्री सध्या कुठे आहे याचा अनेक जणांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला पण यानंतर जे कळाले त्याने सर्वच जणांना धक्का बसला. मुग्धाने खूप अगोदर या जगाचा निरोप घेतला आहे. कॅन्सरमुळे मुग्धाचा 1996 साली मृत्यू झाल्याचे समजते. 
 
मृत्यूसमयी मुग्धा केवळ 31 वर्षाची होती. तिचे लग्न झाले होते आणि लग्नानंतर तिचे नाव मुग्धा उमेश घोडके असे होते. 
 
पुढच्या स्लाईडवर जाणून घ्या मुग्धाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही खास गोष्टी..
बातम्या आणखी आहेत...