आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृणाल दुसानिस साजरी करतेय 1st Wedding Anniversary, बघा लग्नाचा अल्बम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः छोट्या पडद्यावरील ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री मृणाल दुसानीस हिच्यासाठी आजचा दिवस अतिशय खास आहे. त्याचे कारण म्हणजे मृणाल आणि तिचा पती नीरज मोरे आज त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहेत.  अमेरिकास्थित नीरज मोरे याच्याशी मृणाल मागील वर्षी 25 फेब्रुवारी रोजी लग्नाच्ये बेडीत अडकली होती. नाशिकमध्ये मोठ्या थाटात त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. मुळचा पुण्याचा असलेला नीरज मोरे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. या लग्नाला 'असं सासर सुरेख बाई' या मालिकेतील मृणालच्या सहकलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेता संतोष जुवेकरसह अनेक कलाकारांनी मृणालच्या लग्नात उपस्थिती लावली होती.  यावेळी केवळ पुरुषच नव्हे तर सर्व महिलासुद्धा फेटा घालून दिसल्या होत्या. छोट्या पडद्यावर ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तू तिथे मी’ या मृणालच्या मालिका प्रचंड गाजल्या होत्या. शिवाय ‘एकापेक्षा एक अप्सरा आली’मध्ये तिचा डान्सही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.

कशी झाली होती मृणाल-नीरजची पहिली भेट...
मृणाल लॉस एजंलिस येथे महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमानिमित्त गेली असताना नीरज मोरेसोबत तिची ओळख झाली होती. त्यानंतर त्यांचा संवांद फोन आणि इंटरनेटच्या माध्यमातून वाढला. दोघांचे कुटुंबीय आणि विचारांची देवाण-घेवाण झाल्यावर लग्न ठरलं. मृणाल मूळची नाशिकची तर नीरज पुण्याचा आहे. पुण्यात दोघांच्या चहा पोह्यांचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर मी आणि तो फोनवर आणि ऑनलाईन बोलत होतो. काही दिवसानंतर मग आम्ही लग्नाचा निर्णय घेतला, असे मृणालने एका मुलाखतीत सांगितले होते.

अमेरिकेत राहणारेय मृणाल...
नीरजचे कुटुंब पुण्यात राहत असले तरी तो गेल्या सहा वर्षांपासून अमेरिकेतच राहतो. अमेरिकतून एमएस केल्यानंतर नीरज आता लॉस एंजिलिस येथे एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करतोय. पुढची किमान दोन वर्ष तरी तो अमेरिकेतच राहणार असल्यामुळे मृणालही तिची मालिका संपल्यावर अमेरिकेत जाणार आहे. त्यामुळे पुढची काही वर्षे मृणालचे दर्शन तिच्या चाहत्यांना घडणार नाही.

मृणाल आणि नीरजच्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पाहुयात त्यांच्या लग्नाचा अल्बम....
बातम्या आणखी आहेत...