Home »Bollywood »Marathi Cinekatta» Marathi Actress Mrunal Dusanis Exit From Assa Sasar Surekh Bai

खरं सासरं सुरेख करण्यासाठी मृणालचा 'अस्सं सासर..'ला रामराम, ही अभिनेत्री साकारणार 'जुई'

दिव्य मराठी वेब टीम | Aug 12, 2017, 16:36 PM IST

'अस्सं सासर सुरेख बाई' या मालिकेतील जुई अर्थातच अभिनेत्री मृणाल दुसानिस या मालिकेतून प्रेक्षकांचा निरोप घेतेय. आता मृणालच्या जागी नवीन अभिनेत्री जुईच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. ख-या आयुष्यातील सासरं सुरेख करण्यासाठी मालिका सोडत असल्याचे मृणालने सांगितले आहे.
मधू इथे अन् चंद्र तिथे...
मृणालचे 25 फेब्रुवारी 2016 रोजी पुण्याच्या नीरज मोरेसोबत लग्न झाले. नीरज सॉफ्टवेअर इंजिनिअर असून अमेरिकेत वास्तव्याला आहे. तर मृणाल कामानिमित्ताने मुंबईत असते. त्यामुळे लग्नानंतर मधू इथे अन् चंद्र तिथे.. अशी काहीशी अवस्था या दोघांची झाली. पण आता थोडाकाळ कामापासून ब्रेक घेऊन नीरजकडे अमेरिकेला जाण्याचा निर्णय मृणालने घेतला आहे. त्यामुळे आता मृणालने कायमस्वरुपी या मालिकेतून एक्झिट घेण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच मृणालने कलर्स मराठी वाहिनीसोबत मालिका सोडण्याबाबत चर्चा केली होती. वैयक्तिक कारणांसाठी तिला मालिका सोडायची असल्याचे तिने वाहिनीला सांगितले होते. वाहिनीच्या मंडळींनीदेखील तिची समस्या जाणून घेत तिच्या निर्णयाला होकार दिला. मृणाल आता तिच्या पतीसोबत अमेरिकेला जाणार असल्याचे समजतेय. ती काहीच दिवसांत अमेरिकेला रवाना होणार असल्याचे म्हटले जात आहे.
पुढे वाचा, सायली पाटील साकारणार जुई...

Next Article

Recommended