'माझिया प्रियाला प्रित कळेना’, 'तू तिथे मी', ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री मृणाल दुसानिस आता खासगी आयुष्यात सासरी जाण्याचा तयारीत आहे. येत्या 25 फेब्रुवारीला मृणाल लग्नगाठीत अडकणारेय. नीरज मोरे असे तिच्या होणा-या नवऱ्याचे नाव असून तो सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मृणाल आणि नीरजचे हे अरेंज्ड मॅरेज आहे. अगदी कांद्यापोह्यांचा कार्यक्रम करून हे लग्न ठरले. नाशिकमध्ये दोघांचा विवाहसोहळा पार पडणारेय.
मुळचा पुण्याचा असलेला नीरज गेली सहा वर्षे अमेरिकेत राहत आहे. नीरज अमेरिकत स्थायिक असला तरीही त्याचे आई बाबा पुण्यात राहतात. पुण्यात दोघांच्या चहा पोह्यांचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर मी आणि तो फोनवर आणि ऑनलाईन बोलत होतो. काही दिवसानंतर मग आम्ही लग्नाचा निर्णय घेतला, असे मृणालने सांगितले. महत्वाची गोष्ट म्हणजे लग्नानंतर मृणाल अमेरिकेला रवाना होणार आहे.
पुढे वाचा, लग्नानंतर दोन वर्षांचा ब्रेक घेणारेय मृणाल...