आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅपी बर्थडे मृण्मयी : पेशवाई थाटात अडकली होती लग्नगाठीत, लग्नानंतरचा आहे पहिला वाढदिवस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
'अग्निहोत्र', 'कुंकू' या मालिका तर 'नटसम्राट', 'कट्यार काळजात घुसली' या सिनेमांमधून रसिकांच्या मनात अढळस्थान मिळवणारी मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिचा आज वाढदिवस आहे. 29 मे 1988 रोजी जन्मलेली मृण्यमी पुणेकर आहे. पण लग्नानंतर ती आता मुंबईकर झाली आहे. मृण्मयीने वयाची 29 वर्षे पूर्ण केली असून तिचा हा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस आहे. गेल्यावर्षी म्हणजे 3 डिसेंबर 2016 रोजी बिझनेसमन स्वप्नील रावसोबत मृण्मयी लग्नाच्या बेडीत अडकली. अगदी पारंपरिक पद्धतीने दोघांचे शुभमंगल पार पडले. हनीमूनसाठी या दोघांनी न्यूझीलंडची निवड केली होती.

लग्नात होता पेशवाई थाट.. 
मृण्मयी आणि स्वप्नील यांचा लग्नाचे वैशिष्ट्य म्हणजे दोघांच्या लग्नाचा थाट पेशवाई होता. आकर्षक साडीमध्ये नवराई मृण्मयीचं सौंदर्य आणखी खुलून गेले होते. नवरी इतकी नटूनथटून तयार असताना नवरदेव स्वप्नीलसुद्धा मागे कसा राहील. स्वप्नीलने खास पेशवे स्टाइलची पगडी आणि कपडे परिधान केले होते. विशेष म्हणजे या लग्नात व-हाडींनीही पेशवे स्टाइलची पगडी घातली होती.

मृण्मयी-स्वप्नीलचे अरेंज मॅरेज.. 
मृण्मयी आणि स्वप्नीलचे हे अरेंज मॅरेज आहे. स्वप्नील एक बिझनेसमन आहे. अगदी पारंपरिक पद्धतीने दोघांचे लग्न ठरले. लग्नापूर्वी मृण्मयीच्या मेंदी, संगीत सेरेमनी मोठ्या थाटात पार पडली होती. संगीत कार्यक्रमात मृण्मयी स्वप्नीलसोबत ठुमके लावताना दिसली होती. संगीत सेरेमनीत अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि त्याची पत्नी सुखदा खांडकेकर यांनी हजेरी लावली होती. अभिजीतने संगीत सेरेमनीचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमात मृण्मयी आणि स्वप्नीलसोबत त्यांच्या कुटुंबीयांनीही ताल धरला होता.

मराठी कलाकारांची होती हजेरी.. 
मृण्मयी आणि स्वप्नीलच्या लग्नाला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांनी हजेरी लावत या नवदाम्पत्याला शुभाशिर्वाद दिले. महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, सिद्धार्थ चांदेकर, अभिजीत खांडकेकर, सुखदा खांडकेकर, सुनील बर्वे, भार्गवी चिरमुले, अमृता खानविलकर, पूजा सावंत, पुष्कर श्रोत्रीसह, शंकर महादेवन यांसह अनेक सेलिब्रेटींनी मृण्मयी-स्वप्नीलच्या लग्न आणि रिसेप्शनला हजेरी लावली होती. मृण्मयीच्या लग्नसोहळ्याचे फोटोज सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत.

मृण्मयीच्या लग्नाचे औचित्य साधत आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, तिचा लग्नाचा अल्बम... पुढील 24 स्लाईड्सवर बघा, मृण्मयी आणि स्वप्नील यांच्या लग्नाचे खास फोटोज....

(छाया सौजन्यः मृण्मयी देशपांडे आणि P16Studios फेसबुक)

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...