आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day : सईच नव्हे तर हीसुद्धा आहे मराठी इंडस्ट्रीतील Bold अॅक्ट्रेस, साऊथमध्येही आहे बोलबाला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री कुठेही मागे राहू इच्छित नाही. येथील अनेक अभिनेत्री आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखल्या जाऊ लागल्या आहेत. सई ताम्हणकर, श्रुती मराठे, राधिका आपटे, मानसी नाईक या अभिनेत्रींसोबतच आणखी एक मराठमोळे नाव आहे, ज्याची मराठीतच नव्हे तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही चर्चा होते. ते नाव म्हणजे नेहा पेंडसे. नेहा मराठी, हिंदीतीलच नव्हे तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नावाजलेला चेहरा आहे. आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी प्रसिद्ध असलेल्या नेहाचा आज वाढदिवस असून तिने वयाची 31 वर्षे पूर्ण केली आहेत. 29 नोव्हेंबर 1984 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला.
नेहाने ब-याच दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केले आहे. त्यानंतर तिने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. ‘असीमा’ हा तिचा पहिला साऊथमधील सिनेमा 2009 मध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर ‘ट्रीम्स’, ‘मेड इन यूएसए’, ‘स्वामी’, ‘विधी राऊडी’, ‘सोन्यम’ यांसारखे अनेक सिनेमे तिने साऊथमध्ये केले. साऊथमधील चारही भाषांमध्ये तिने काम केले आहे. नेहा म्हणते, साऊथमधील आपल्या अनुभवांविषयी सांगताना नेहा म्हणते, ‘‘साऊथच्या सिनेमांना स्थानिकांचा चांगला पाठिंबा मिळतो. याशिवाय, तेथील इंडस्ट्री चांगल्या अर्थाने खूप प्रोफेशनल आहे. त्यामुळे कामाचे समाधान मिळते.’’
'डाग-द फायर' या हिंदी सिनेमात बाल कलाकार म्हणून भूमिका केली होती. याशिवाय अशोक समेळ लिखीत आणि दिग्दर्शित 'परपुरुष' या नाटकाद्वारे तिने मराठी रंगभूमीवरही पदार्पण केले आहे. 'दुसरी गोष्ट', 'प्रेमासाठी कमिंग सून', 'शर्यत', 'बाळकडू' हे अलीकडच्या काळात रिलीज झालेले तिचे मराठी सिनेमे आहेत.
आज नेहाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तिच्या फॅन्ससाठी घेऊन आलो आहोत, तिच्या लक्ष वेधून घेणा-या हॉट आणि सिझलिंग अंदाजातील छायाचित्रांची खास झलक...