आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

...म्हणून बॉयफ्रेंडने केले होते नेहासोबत ब्रेकअप, इंडस्ट्रीत झाली होती शारीरिक संबंधाची मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री कुठेही मागे राहू इच्छित नाही. येथील अनेक अभिनेत्री आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखल्या जाऊ लागल्या आहेत. सई ताम्हणकर, श्रुती मराठे, राधिका आपटे, मानसी नाईक या अभिनेत्रींसोबतच आणखी एक मराठमोळे नाव आहे, ज्याची मराठीतच नव्हे तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही चर्चा होते. ते नाव म्हणजे नेहा पेंडसे. नेहा मराठी, हिंदीतीलच नव्हे तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नावाजलेला चेहरा आहे. आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी प्रसिद्ध असलेल्या नेहाचा आज वाढदिवस असून तिने वयाची 33 वर्षे पूर्ण केली आहेत. 29 नोव्हेंबर 1984 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. 


नेहाने आजपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही तिने मुख्य भूमिकाही केली आहे. पण, नेहाला या प्रवासात काही अडथळ्यांनाही सामोरं जावं लागलं. नेहाला चित्रपटसृष्टीत काम करताना, अनेक जणांकडून कास्टींग काऊचची ऑफर आली होती. स्वतः नेहाने एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता.


काय म्हणाली होती नेहा...
नेहा म्हणाली होती, ''माझ्या कुटुंबातील कुणीही चित्रपटसृष्टीशी संबंधित नाहीये. त्यामुळे ज्यावेळी मी या फिल्डमध्ये काम करण्याचं ठरवलं त्यावेळी अनेकांनी टीका केली. कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच मला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला. दाक्षिणात्य आणि हिंदीमध्ये काम शोधताना मला सतत कास्टींग काऊचसाठी विचारण्यात आले आहे. मी नेहमीच या गोष्टीला विरोध करुन पुढे गेले आहे.  या गोष्टीसाठी ज्यांनी होकार दिला त्या अभिनेत्री आज शिखरावर पोहचल्या आहेत. ज्या मुलींनी हे केलेय त्या चुकीच्या आणि ज्यांनी हे केले नाही त्या बरोबर असे माझे अजिबात म्हणणे नाही. या फील्डमध्ये तुमचा गॉड फादर असणे गरजेचे आहे. पण, याचा अर्थ असा नाही की, तुमची कास्टींग काऊचपासून सुटका होईल. गॉड फादर असल्यास तुम्हाला योग्य वाट सापडते आणि काम शोधण्यासही सोयीस्कर पडतं, हाच याचा फायदा आहे.''

 

पुढे वाचा,

> 'मे आय कम इन मॅडम' या मालिकेच्या निर्मात्यांनी का दिला होता नेहाला अल्टिमेटम... 
> कोणत्या कारणामुळे बॉयफ्रेंडने घेतला नेहाच्या आयुष्यातून काढता पाय... 
> बॉयफ्रेंडने ब्रेकअप केल्यानंतर मानसिक तणावात होती नेहा... 

>  वयाच्या 10 व्या वर्षी मिळाली होती पहिली सॅलरी

>  अभिनय क्षेत्राची निवड केल्याने झाली होती बरीच टीका...

>  मीडल क्लास फॅमिलीतून आहे नेह... यासह बरंच काही...  

बातम्या आणखी आहेत...