आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोज्वळ भूमिका साकारणारी \'रमा\' मुळात आहे इतकी ग्लॅमरस, लहान वयातच अडकली लग्नगाठीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रितेश देशमुखचा आगामी सिनेमा 'फास्टर फेणे'मध्ये अमेय वाघसोबत प्रसिद्ध अभिनेत्री पर्ण पेठे झळकणार आहे. मृणाल कुलकर्णी यांच्या 'रमा माधव' या सिनेमात रमाची भूमिका साकारुन घराघरात पोहोचलेली पर्ण मराठी इंडस्ट्रीमध्ये एक गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पण पडद्यावर साकारलेली रमा आणि प्रत्यक्षातील पर्ण फार वेगळी आहे. पर्ण ही खऱ्या आयुष्यात फारच ग्लॅमरस आहे. 
 
मराठीतील फॅशनिस्टा म्हणून आहे ओळख..
पर्णचे फेसबुक असो अथवा इंस्टाग्राम, तिचा उत्तम फॅशन सेंस आपल्याला पाहायला मिळतो. सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी आणि पूजा सावंतपाठोपाठ आता पर्णचे नावही आता मराठीतील फॅशनेबल नायिकांच्या यादीत आहे. 
 
वडील आहेत प्रसिद्ध दिग्दर्शक..
पर्णचे वडील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि लेखक आहेत त्यांचे नाव आहे अतुल पेठे. पर्ण मुळची पुण्याची असून तिने मानसशास्त्र विषयात मास्टर्सची डिग्रीही मिळवली आहे. पर्ण केवळ एक उत्तम अभिनेत्री नव्हे तर बुद्धीमत्तेचाही संगम आहे. कॉलेजमध्ये असतानापासून पर्ण अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेत असे. कॉलेजमध्ये पुरुषोत्तम करंडक नाट्य स्पर्धेत सत्यशोधक या व्यावसायिक नाटकात पर्णने सावित्रीबाईंची भूमिका केली होती. त्यातील तिचे अभिनयकौशल्या पाहून 2014 साली मृणाल कुलकर्णी यांच्या 'रमा माधव' या चित्रपटातील रमा साकारण्याची संधी तिला मिळाली आणि मिळालेल्या संधीचे तिने सोने केले. 2015 साली मराठी फिल्मफेअर पुरस्कारात तिला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला.
 
पहिल्याच चित्रपटातील अभिनेत्यासोबत अडकली विवाहबंधनात..
पर्णने 'रमा माधव' चित्रपटात रमाची तर माधवची भूमिका अभिनेता आलोक राजवाडेने साकारली होती. या चित्रपटाच्या सेटवरच दोघे प्रेमात पडले आणि 29 फेब्रुवारी 2016 साली दोघांनी लग्न केले. अभिनयाच्या सुरुवातीच्या काळातच पर्णने विवाहाचा निर्णय घेतला.      
 
या चित्रपटात केले आहे काम..
पर्णने 'रमा माधव' तसेच 'फोटोकॉपी', 'वाय झेड' यांसारख्या चित्रपटात काम करुन तिचे अभिनयकौशल्य दाखवले आहेत. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, पर्ण पेठेचे खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...