आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे कडू फळ खाऊन मग होते गोडधोडाला सुरुवात, दिवाळीच्या या खास परंपरेबद्दल सांगतेय पूजा सावंत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठीतील एक गोड तसेच ग्लॅमरस अभिनेत्री अशी पूजा सावंतची ओळख आहे. श्रावणक्वीन विजेती बनत नाशिक ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या पूजा सावंतने कमी कालावधीतच  स्वतःची अशी ओळख निर्माण केली आहे. दिवाळीनिमित्त एका स्पेशल बातचीतमध्ये पूजाने आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि तिच्या दिवाळीच्या प्लानबद्दल माहती दिली. अगदी फिट अॅण्ड फाईन दिसणारी पूजा सावंत फराळावर मनसोक्त ताव मारत मारत असेल असे कोणी सांगितले तर आपल्याला विश्वास बसणार नाही, पण हे सांगितले आहे खुद्द पूजा सावंतने...
 
अशी साजरी करते दिवाळी..
पूजा म्हणते की, "दिवाळीत आम्ही कधीच फटाके वाजवत नाही. केवळ खूप साऱ्या पणत्या लावतो आणि शांतपणे दिवाळी साजरा करण्यावर भर देतो. दिवाळी दिवशी सूर्योद्याच्या अगोदर  उठून अभ्यंगस्नान करते, दिवाळीची ती सकाळ फारच स्पेशल असल्यासारखी वाटते. सकाळचा नजारा त्यावेळी फारच मनमोहक वाटतो."
 
हे कडू फळ खाऊन करतात फराळाला सुरुवात...
पूजा सांगते की, "आमच्या घरी फराळ खाण्याला सुरुवात करण्यापूर्वी कारेट  हे कडू फळ खाल्ले जाते. दिवाळीचा फराळ आणि गोड पदार्थ खाण्यास सुरुवात करण्याअगोदर हे कडू फळ खाण्याची प्रथा आहे आणि ते अजूनही पाळले जाते."
 
डाएट अजिबात पाळत नाही..
पूजा सांगते की, "दिवाळी असा सण असतो की त्यावेळी डाएट पाळण्याचा अजिबातच विचार करत नाही. आईच्या हातचे गोडधोड जेवण आणि फराळाचा बेत याला मी कधीच नाही म्हणू शकत नाही. आधी गणपतीच्यावेळी मोदक, नवरात्रात आमच्या घरात बनणारी नऊ प्रकारची खीर आणि मागोमाग आलेल्या दिवाळीच्या फराळाला डाएट प्लानचा विचार करत नाही म्हणणे शक्यच नसते. "
 
दिवाळीत मामाच्या गावाची लागते अजूनही ओढ...
पूजा सांगते, "दिवाळीच्या दिवसांत घरच्यांसोबत तसेच नातेवाईक, मित्रमैत्रीणींसोबत वेळ घालवण्यासाठी वेळ मिळाल्याने मी फारच आनंदीत असते, लक्ष्मीपुजन झाल्यानंतर पाहूणे तसेच मित्रमैत्रीणीसोबत एकमेकांच्या घरी जाणेयेणे होते. खास भाऊबीजनिमित्त मामाच्या घरी जाण्याचीही ओढ लागते."
 
पर्यावरण, प्राण्यांबद्दल जागरुक आहे पूजा...
पर्यावरणाबाबत पूजा फार जागरुक आहे. ती सांगते की, "पर्यावरणाचा माणसाने खूप हानी केली आहे त्यामुळे अजून हानी करण्यापेक्षा पर्यावरणाला काहीतरी देण्याचा प्रयत्न करावा. फटाके न फोडता तेच पैसे गोळा करुन ज्यांच्याकडे दिवाळी साजर करण्यासाठी पैसे नाहीत अशांना ती मदतस्वरुपात द्यावी. दिवाळी सेलिब्रेट करण्याचा याहून चांगला दुसरा मार्ग नाही. काहीजण तर कुत्र्या-मांजरांच्या शेपटीला फटाके लावून ते फोडतात अशा माणसांना तर काठी घेऊन मारण्याची इच्छा होते असे पूजा सांगते.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, पूजा सावंतचे  काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...