आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्षाबंधन 2017 : दोन बहिणींचा एकुलता एक लाडका भाऊ श्रेयस, सांगतेय पूजा सावंत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुलै महिन्यात अभिनेत्री पूजा सावंतची हॅटट्रिक झाली. तिचे सलग तीन सिनेमे या महिन्यात रिलीज झाले. 14 जुलै रोजी 'लपाछपी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यापाठोपाठ 21 जुलै रोजी 'बसस्टॉप' आणि 28 जुलै रोजी 'भेटली तू पुन्हा' हे सिनेमे रिलीज झाले. विशेष म्हणजे मराठीत प्रथमच एका नायिकेचे सलग तीन चित्रपट रिलीज होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे म्हटले जात आहे. पूजा सावंतने अल्पावधीतच मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. इंडस्ट्रीतीली ती बिझी अभिनेत्रींपैकी एक आहे. पण कामात कितीही बिझी असली तरी सणांच्या दिवशी आवर्जुन घरी राहत असल्याचे पूजा सांगते. रक्षाबंधनाच्या निमित्ताने पूजाच्या घरी कसं असतं सेलिब्रेशन हे आम्ही जाणून घेतलंय. 

पूजाला एक बहीण आणि एक भाऊ आहे. पूजा थोरली असून भाऊ सगळ्यात लहान आहे. रुचिरा आणि श्रेयस ही तिच्या बहीणभावंडांची नावं आहेत. पूजा सांगते, "आम्ही खूप साध्या पद्धतीने राखी पौर्णिमा साजरी करतो. सध्याच्या मिळणा-या मॉर्डन राखीपेक्षा आम्ही अतिशय साध्या राखीला प्राधान्य देतो. मुळात एकत्र येणं हाच एक हेतू असतो. चुलत बहीणभावंडांसोबत आम्ही हा सण साजरा करतो. आम्ही सगळेजण दरवर्षी एका नातेवाईकाच्या घरी एकत्र जमत असतो. पारंपरिक पद्धतीने रक्षाबंधनाचा सण आमच्या घरी साजरा होतो. मी कामात कितीही बिझी असले, तरी सुदैवाने सणाच्या दिवशी मी घरी नाही, असे कधी झाले नाही. समजा एखाद्या वर्षी काम आले तरी पहाटे भावाला राखी बांधूनच मी घराबाहेर पडले आहे. राखीचा सण मी कधीच मिस केलेला नाही."

श्रेयस दोन्ही बहिणीत सर्वात लहान आहे. त्यामुळे त्याच्याकडून गिफ्ट मिळतात, की रक्षाबंधनाला त्याला गिफ्ट द्यावं लागतं, असे पूजाला विचारला असता, ती म्हणते, "तो लहान असला तरी गिफ्ट्स देण्यात तोच आघाडीवर असतो. प्रत्येक रक्षाबंधनाला त्याने आम्हा बहिणींना सुंदर वस्तू गिफ्ट म्हणून दिल्या आहेत. किंबहुना आमच्या गिफ्ट्सपेक्षा त्याचे गिफ्ट जास्त स्पेशल असतात." 

पुढील स्लाईड्सवर बघा, श्रेयस आणि रुचिरासोबतची पूजाची खास छायाचित्रे...
 
सेलिब्रिटी रक्षाबंधन स्पेशल... 
>> रक्षाबंधन 2017 : 15 चुलत भावंडांची एकुलती एक बहीण आहे लक्ष्मीकांत बेर्डेंची मुलगी स्वानंदी 
>> रक्षाबंधन 2017 : सोबत नसलो तरी गिफ्ट्स न चुकता पाठवतो भाऊ, सांगतेय मुक्ता
>> रक्षाबंधन 2017 : यंदा गश्मीर रक्षाबंधनाला सोबत नाही, तरी बहीण म्हणतेय ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही!’
>> रक्षाबंधन 2017 : दोन भावांची लाडकी बहीण आहे सोनाली कुलकर्णी, सांगतेय कसे असते सेलिब्रेशन
>> रक्षाबंधन 2017 : 'पुढचं पाऊल' फेम स्वप्नालीला नाहीये सख्खा भाऊ, बालपणी बहिणीलाच बांधायची राखी 
>> रक्षाबंधन 2017 : रक्षाबंधन 2017 : निर्मिती-कमलेशचे हे रेशमी बंध, 'जाडूबाई जोरात'च्या सेटवर जाऊन दिले सरप्राइज
बातम्या आणखी आहेत...