आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Congratulations: विनोदाची राणी प्राजक्ता अडकली लग्नाच्या बेडीत, साध्या पद्धतीने केले लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी मालिका आणि कॉमेडी शोजमध्ये झळकणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता हनमघर हिचे शुभमंगल झाले आहे. 14 ऑगस्ट रोजी अगदी साध्या पध्दतीने प्राजक्ता विवाहबंधनात अडकली. रजत धळे हे तिच्या जोडीदाराचे नाव आहे. विशेष म्हणजे रजतचा कलाविश्वाशी काहीच संबंध नाहीये. तो मुळचा धुळ्याचा असून आता पुण्यातील एका प्रतिष्ठित कॉर्पोरेट कंपनीत कामाला आहे. प्राजक्ताने लग्नाचे खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.  
 
‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’, ‘फू बाई फू’ आणि ‘कॉमेडीची जीएसटी’ या कार्यक्रमांमुळे प्राजक्ता घराघरांत पोहोचली आहे. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेतील तिची भूमिका विशेष गाजली होती.  

पाहुयात, प्राजक्ता आणि रजतच्या लग्नाचे खास फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...