आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: प्रेक्षकांच्या लाडक्या मेघनाला व्हायचे आहे राजकारणी, जाणून घ्या तिच्या खास गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली मेघना अर्थातच अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा आज 26 वा वाढदिवस आहे. 8 ऑगस्ट 1989 रोजी पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात प्राजक्ताचा जन्म झाला. तिची आई गृहिणी तर वडील पोलिस दलात कार्यरत आहे.
भरत नाट्यममध्ये पारंगत
प्राजक्ता पुण्यातील ललित कला केंद्रातील विद्यार्थिनी आहे. अभिनयाचा पाया ललित केंद्रामध्येच मजबूत झाल्याचे प्राजक्ताने सांगितले. तिने काही दिवस नृत्यदिग्दर्शिका म्हणूनही काम केले आहे.
आईच्या पाठिंब्यामुळे अभिनय क्षेत्रात पदार्पण
कला क्षेत्रामध्ये प्राजक्ताच्या कुटुंबातील कोणीही नाही. तिच्या आईला कलेची लहानपणापासूनच खूप आवड होती, मात्र त्यांना कधी संधी मिळाली नाही. त्यामुळे आपल्या मुलीने या क्षेत्रात करिअर करावे अशी त्यांची प्रचंड इच्छा होती. अभिनेय क्षेत्रातील प्रेरणास्थान आई असून, याचे संपूर्ण श्रेय आईलाच जाते, असे प्राजक्ताने एका मुलाखतीत सांगितले.
छोट्या आणि मोठ्या पडद्यावर मिळाली अभिनयाची संधी
दिवंगत दिग्दर्शक संजय सुरकर यांच्या 2007 मध्ये रिलीज झालेल्या 'तांदळा एक मुखवटा' या सिनेमात प्राजक्ता सर्वप्रथम झळकली होती. त्यानंतर दिवंगत निर्मात्या-अभिनेत्री स्मिता तळवलकर यांच्या 'सुवासिनी' या मालिकेत 'सावी' हे पात्र साकारण्याची संधी तिला मिळाली. या मालिकेमुळे प्राजक्ता सर्वप्रथम प्रकाशझोतात आली होती. छोट्या पडद्यावरील 'गुडमॉर्निंग महाराष्ट्र', 'गाणे तुमचे आमचे', साम मराठीवरील 'सुगरण', 'फिरूनी नवीन जन्मेन मी' या कार्यक्रमांमध्ये ती झळकली. 'सुवासिनी' या मालिकेमुळेच तिला केदार शिंदेच्या 'खो-खो' या सिनेमात काम करण्याचीही संधी मिळाली होती. सध्या प्राजक्ता झी मराठी वाहिनीवरील 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेत मेघना हे पात्र साकारत आहे.
राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा
भविष्यात संधी मिळालीच तर व्यवस्था सुधारण्यासाठी राजकारणात येण्याची इच्छा असल्याचे प्राजक्ताने एका मुलाखतीत बोलून दाखवले. याशिवाय नृत्य करायला आवडत असल्यामुळे त्यामध्ये तिला पीएच.डी करायची आहे. छोट्या आणि मोठ्या पडद्यासोबतच रंगभूमीवरही तिला काम करायचे आहे.
प्राजक्ताच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला तिची खासगी आयुष्यातील काही निवडक छायाचित्रे दाखवत आहोत...
बातम्या आणखी आहेत...