आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Engaged : प्रार्थनाचा झाला साखरपुडा, म्हणाली-'आम्ही घेतला शेवटपर्यंत साथ देण्याचा निर्णय'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिका प्रार्थना बेहरे हिचा नुकताच साखरपुडा झाला असून तिने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केला आहे. अभिषेक जावकर हे प्रार्थनाच्या जोडीदाराचे नाव आहे. साखरपुड्याचा फोटो पोस्ट करुन #engaged #forlife #forevercommitted #lifepartner #myfiancé #happyme #godiskind हे हॅशटॅग प्रार्थनाने  दिले आहेत. सोबतच ‘आम्ही दोघांनी एकमेकांची शेवटपर्यंत साथ देण्याचा निर्णय घेतला’, असे कॅप्शनही तिने दिले आहे.  या फोटोत ब्लू कलरच्या डिझायनर ड्रेसमध्ये प्रार्थना अतिशय सुंदर दिसतेय. 
 
प्रार्थना-अभिषेकचे आहे अरेंज्ड मॅरेज...
अभिषेक आणि प्रार्थनाचे हे अरेंज्ड मॅरेज आहे. फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत असून देखील दोघांची ओळख नव्हती. मॅरेज ब्युरोच्या माध्यमातून दोघांची भेट झाली. याविषयी प्रार्थना सांगते, "अभिनेत्यासोबत लग्न करायचे नाही, हे मी सुरुवातीपासूनच ठरवले होते. मॅरेज ब्युरोच्या माध्यमातून आमची भेट झाली.लग्नासाठी 14 नोव्हेंबरचा मुहूर्त निश्चित झाला आहे. आमचे डेस्टिनेशन वेडिंग असणार आहे." लग्नानंतर फिल्म इंडस्ट्रीत काम सुरु ठेवणार असल्याचे प्रार्थना सांगते. 
 
पुढे वाचा, प्रार्थनाच्या भावी नव-याविषयी सर्वकाही...
बातम्या आणखी आहेत...