आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रार्थनाचा झाला गृहप्रवेश, संगीत सेरेमनीत नव-यासोबत धरला होता ताल, बघा NEW वेडिंग PICS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या नायिकांपैकी एक नायिका म्हणजे प्रार्थना बेहरे. प्रार्थनाने नुकतीच तिच्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली आहे. दिग्दर्शक अभिषेक जावकरसोबत 14 नोव्हेंबर रोजी प्रार्थना विवाहबद्ध झाली. गोव्यात दोघांनी डेस्टिनेशन वेडिंग केले. लग्नानंतर आता प्रार्थनाचा सासरी गृहप्रवेश झाला आहे. प्रार्थनाच्या गृहप्रवेशाचे तीन फोटोज समोर आले आहेत. या फोटोजमध्ये प्रार्थना निळ्या रंगाच्या साडीत अतिशय सुंदर दिसतेय. सासरी प्रवेश करतानाचा आनंद स्पष्ट तिच्या चेह-यावर झळकतोय. 


संगीत सेरेमनीत नव-यासोबत धरला होता ताल...
गोव्यात झालेल्या डेस्टिनेशन वेडिंगमध्ये प्रार्थना आणि अभिषेकच्या मेंदी आणि हळदी सेरेमनीसोबतच संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते. संगीत सेरेमनीत प्रार्थनाचे फिल्म इंडस्ट्रीतील जवळचे मित्र वैभव तत्त्ववादी, प्रसाद जवाथे यांनी धमाकेदार सादरीकरण केले. इतकेच नाही तर मिस्टर अँड मिसेस सदाचारी या चित्रपटातील गाण्यांवर प्रार्थनाने अभिषेकसोबत ताल धरला होता. प्रार्थनाप्रमाणेच अभिषेकसुद्धा एक चांगला डान्सर असल्याचे दिसून येत आहे. 


या पॅकेजमधून बघुयात, प्रार्थनाच्या गृहप्रवेशासोबतच तिस-या स्लाइडवर संगीत सेरेमनीतील व्हिडिओ आणि लग्नाचे नवीन फोटोज.... 

बातम्या आणखी आहेत...