आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day : प्रियाच्या घरुन होता लग्नाला नकार, अशी आहे या क्यूट कपलची Love Story

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः मराठी इंडस्ट्रीतीली आघाडीची अभिनेत्री प्रिया बापट हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 31 वर्षे पूर्ण केली आहेत. प्रियाचे लग्न मराठी अभिनेता उमेश कामतसोबत झाले आहे. उमेश प्रियापेक्षा तब्बल आठ वर्षांनी मोठा आहे. 18 सप्टेंबर 1986 ही प्रियाची जन्मतारीख आहे तर 12 डिसेंबर 1978 रोजी उमेशचा जन्म झाला. विशेष म्हणजे उमेशने नव्हे तर चक्क प्रियाने उमेशला लग्नाची मागणी झाली होती. 

अशी झाली होती दोघांची पहिली भेट..
‘भेट’ या चित्रपटात दोघांनी काम केले होते. पण या चित्रपटात दोघांचा एकही सीन एकत्र नव्हता. चित्रपटाच्या प्रिव्ह्यूच्या वेळी दोघांची पहिली भेट झाली होती. तेव्हा प्रिया बापट म्हणजे ‘दे धमाल’मधली बालकलाकार एवढेच उमेश तिला ओळखल होता. ‘आभाळमाया’च्या या मालिकेच्या दरम्यान दोघांची पुन्हा एकदा भेट झाली. त्यानंतर त्यांच्या फारशा भेटीगाठी झाल्या नाहीत. पण दोघांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले होते.  एकमेकांचे फोन नंबर घेतले. त्यानंतर ‘वादळवाट’ मालिका सुरू झाली. त्याकाळात दोघांमध्ये मेसेजेस व्हायला लागले. हळूहळू भेटीगाठी वाढू लागल्या. 

प्रियाने घातली होती लग्नाची मागणी 
2003 साली दोघांची भेट झाली होती. भेटीच्या तीन वर्षांनी म्हणजे ऑगस्ट 2006 साली प्रियानेच उमेशला लग्नाची मागणी घातली. पण उमेशच्या मनात तिच्याविषयी होकार असूनदेखील त्याने महिनाभर तिला उत्तर दिले नाही. प्रियाच्या वाढदिवशी लग्नासाठी होकार द्यायचे त्याने ठरवले होते. अखेर 18 सप्टेंबर 2006 रोजी उमेशने प्रियाच्या प्रेमाचा स्वीकार करत लग्नासाठी होकार दिला. पाच वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर ऑक्टोबर 2011 मध्ये उमेश आणि प्रिया यांनी लग्न केले. 

प्रियाच्या घरुन होता लग्नाला नकार.. 
2006 साली उमेश सिनेसृष्टीत स्थिरस्थावर झाला नव्हता. त्यामुळे प्रियाच्या घरुन या लग्नासाठी नकार होता. पण आई-बाबांच्या विरोधात जाऊन काहीच करायचं नाही, हे त्यावेळी दोघांनीही ठरवले होते. या संघर्षाविषयी उमेश आणि प्रिया यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते, "आम्ही एकमेकांना होकार कळवल्यावर घरी लगेच सांगितलं नव्हतं. माझ्या घरी काही अडचण नव्हती. तिच्या घरी मात्र लग्नाच्या आदल्या वर्षीपर्यंत म्हणजे साधारण चार-पाच वर्षे लढाई सुरूच राहिली. पण, आम्ही प्रयत्न करत राहिलो. इंडस्ट्रीतही हळूहळू चर्चा होऊ लागली होती. पण, आम्हाला घाई नव्हती. सगळ्यांच्या परवानगीने, आनंदाने आम्हाला लग्न करायचं होतं. शेवटी तसंच झालं. आम्ही ठरवल्याप्रमाणे झाल्याचा आम्हाला आनंद आहे." 

लग्नाच्या वर्षभराने मुंबईत घेतले स्वतःचे घर...
2003 पासून उमेशचे मुंबईत स्वतःचे घर घेण्याचे प्रयत्न सुरु होते. पण त्याचे हे स्वप्न 2012 साली प्रत्यक्षाता उतरले. प्रियासोबत लग्नानंतर वर्षभराने उमेशने मुंबईत स्वतःचा आशियाना घेतला.  

पुढच्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये या दोघांच्या लग्नाला सहा वर्षे पूर्ण होणार आहेत. मुंबईत अगदी मराठमोळ्या थाटात दोघांचे लग्न झाले होते.  पाहुयात, या क्यूट कपलचे लग्नाचे खास Photos... 
बातम्या आणखी आहेत...