Home »Bollywood »Marathi Cinekatta» Marathi Actress Rashmi Anpat 55 Thousand Followers On Instagram

'कुलस्वामिनी' फेम रश्मी अनपटचे इन्स्टाग्रामवर 55 हजार फॉलोअर्स

दिव्य मराठी वेब टीम | Sep 13, 2017, 10:53 AM IST

सोशल मीडियामध्ये प्रेक्षक त्यांच्या आवडत्या सेलिब्रेटींना फॉलो करत असतात. अनेक सेलिब्रेटींचे हजारो फॉलोअर्स असल्याचं पहायला मिळतं. त्यात आता स्टार प्रवाहच्या 'कुलस्वामिनी' या मालिकेतील आरोही, म्हणजेच रश्मी अनपटचं नाव समाविष्ट झालं आहे. इन्स्टाग्रामवर रश्मीचे 55 हजार फॉलोअर्स झाले आहेत.

आस्तिक नास्तिकतेच्या वेगळ्या संघर्षाची कहाणी असलेल्या 'कुलस्वामिनी' या मालिकेत रश्मीनं आरोही ही भूमिका साकारली आहे. लग्नानंतर देवधर कुटुंबात परिवर्तन करण्याचा तिचा प्रयत्न आहे. मोकळ्या मनाची अशी ही मुलगी आहे. तिच्या या भूमिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. तसंच या मालिकेची लोकप्रियता वाढत आहे. त्यामुळेच तिचे फॉलोअर्स प्रचंड वाढत आहेत. 'कुलस्वामिनी' ही मालिका सुरू होण्यापूर्वी इन्स्टाग्रामवर रश्मीचे 32 हजार फॉलोअर्स होते. त्यानंतर अल्पावधीतच रश्मीचे फॉलोअर्स वाढून तिनं 55 हजारांचा टप्पा पार केला. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रेमानं रश्मीही आनंदित झाली आहे. तिनं आपल्या फॅन्सचे मनापासून आभार व्यक्त केले.
पाहुयात, रश्मीची इन्स्टाग्राम डायरी...

Next Article

Recommended