आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day Spl: जेवढी बोल्ड तितकीच सोज्वळ दिसते सई, 30 फोटोजमध्ये बघा घायाळ करणा-या अदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः ग्लॅमरस, हॉट, बोल्ड अंदाज असणाऱ्या सईच्या रुपाची जादू फिल्म इंडस्ट्रीत तर आहेच पण लाखो मुली तिला फॉलो करताना दिसतात. मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचे नाव आग्रहाने घेतले जाते. ब्रेन वीथ ब्युटी असे परफेक्ट कॉम्बिनेशन सईमध्ये पाहायला मिळते. तिने आत्तापर्यंत केलेल्या सगळ्याच भूमिका वेगवेगळ्या शेड्सच्या आणि जॉनरच्या आहेत.
याच बोल्ड आणि बिनधास्त सईचा 25 जूनला 30 वा वाढदिवस होता. 25 जून 1986 रोजी सांगलीत तिचा जन्म झाला. अल्पावधीतच सईने आपला मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. ‘पुणे ५२’, ‘बीपी’, ‘अनुमती’, ‘सौ. शशी देवधर’, ‘दुनियादारी’, 'हंटर' यांसारख्या सिनमांतून चमक दाखवणारी सई मराठी अभिनेत्रीचे ख-या अर्थाने आधुनिक रूप आहे.

'नो एन्ट्री पुढे धोका आहे' या सिनेमात बिकिनी परिधान करुन स्वतःची बोल्ड आणि बिनधास्त इमेज तयार केली. ती आज मराठी इंडस्ट्रीतली ती एक टॉपची अभिनेत्री बनली आहे. मोठ्या पडद्यावर सई कधी बोल्ड, कधी सेक्सी तर कधी साध्या रूपात दिसली. तिचे प्रत्येक रुप तिच्या चाहत्यांना भूरळ घालणारा ठरला आहे.
सईच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला छायाचित्रांच्या माध्यमातून तिचा चाहत्यांना घायाळ करणारा अंदाज दाखवत आहोत...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...