आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेहा पेंडसेनंतर आता या फेमस मराठी अॅक्ट्रेसचा पोल डान्स होतोय व्हायरल, उमा भेंडेंची आहे सून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे सध्या तिच्या पोल डान्स व्हिडिओमुळे चर्चेत आहे. आपल्या शूटिंगच्या बिझी शेड्यूलमधूनही ती फिटनेसला तेवढाच वेळ देत आहे. गेल्या काही दिवसांपासून तिचे पोल डान्सचे विविध व्हिडिओज तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर बघायला मिळत आहेत. विशेष म्हणजे नेहाच नव्हे तर आणखी एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पोल डान्स हा फिटनेसचा एक नवीन फंडा अंमलात आणताना दिसत आहेत. आम्ही बोलतोय ते श्वेता महाडिक हिच्याविषयी. श्वेता सुद्धा फिटनेससाठी पोल डान्सची मदत घेतेय. पोल डान्स करतानाचे अनेक फोटोज आणि व्हिडिओज श्वेताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. पोल डान्सचा एक फोटो पोस्ट करुन श्वेताने लिहिले, ''Just chilling.. #polefitness#sundayprogress#inversion#oneleghang#nevermissaworkout''

श्वेता ही दिवंगत अभिनेत्री उमा भेंडे यांची थोरली सून आहे. उमा भेंडे यांचा थोरला मुलगा आणि प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर प्रसाद भेंडेसोबत श्वेताचे लग्न झाले आहे. याचवर्षी 19 जुलै रोजी उमा भेंडे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. 
 
श्वेताचा पती प्रसाद हा मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आहे. 'दुनियादारी' या सिनेमामुळे प्रसाद प्रसिद्धीझोतात आला. 'दुनियादारी' या सिनेमातून प्रसादचे सिनेमॅटोग्राफर म्हणून मराठी चित्रपटसृष्टीतील पदार्पण झाले. पहिल्याच सिनेमासाठी अनेक पुरस्कार आपल्या नावी केले. 'दुनियादारी'नंतर 'मितवा', 'लोकमान्य', 'प्यारवाली लव्हस्टोरी', 'वेलकम जिंदगी', 'पेइंग घोस्ट' आणि इतर अशा बड्या सिनेमांसाठी त्याने सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केले. 'लोकमान्य' सिनेमासाठी त्याने सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफरचा पुरस्कार मिळवला.
 
पुढील स्लाईड्सवर वाचा, श्वेताविषयी बरंच काही आणि सोबतच बघा, तिचे पोल डान्सचे व्हिडिओ...  
बातम्या आणखी आहेत...