आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिला नकोसे वाटतात पुरुष, वाचा 'माझ्या नव-याची बायको'मधल्या स्पष्टवक्त्या रेवतीविषयी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः पुरुषांचा तिरस्कार करणारी, रोखठोक मतं मांडणारी ही आहे रेवती. बरोबर 'माझ्या नव-याची बायको' या मालिकेत राधिकाची खास मैत्रीण ही आहे रेवती. मालिकेत नव-यापासून घटस्फोट घेऊन एकटीने आपल्या मुलीचा सांभाळ ती करतेय. गुरु उर्फ गॅरीचे एक्स्ट्रा मॅरिटिअल अफेअर असल्याचा संशय रेवतीला आला आहे. तसं तिने राधिकाला सावधानसुद्धा केलंय. मात्र बिचारी राधिका मैत्रिणीऐवजी आपल्या नव-यावरच विश्वास ठेवतेय. पण येणा-या दिवसांत रेवती गुरुनाथचा राधिकासमोर पर्दाफाश करणार हे नक्की.
मालिकेत रेवतीची भूमिका साकारणा-या या अभिनेत्रीचे नाव आहे श्वेता मेहंदळे. खास गोष्ट म्हणजे आज (6 सप्टेंबर) श्वेताचा वाढदिवस आहे. सोशल मीडियावर चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षावर होतोय. श्वेता प्रसिद्ध मराठी अभिनेता राहुल मेहंदळेची पत्नी आहे. या मालिकेपूर्वीही छोट्या आणि मोठ्या पडद्यावर श्वेता झळकली आहे.
मालिकेत धीरगंभीर रेवतीची भूमिका साकारणारी श्वेता खासगी आयुष्यात फन लविंग आहे. तिच्या सोशल नेटवर्किंग साइट्वर फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत धमाल करतानाची तिची बरीच छायाचित्रे बघायला मिळतात.
आज श्वेताच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला दाखवतोय, तिचे काही पर्सनल क्लिक्स... या छायाचित्रांमध्ये श्वेता फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत दिसतेय.
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...