(अभिनेत्री सिया पाटील)
संघर्षातून वाट काढत यशोशिखर गाठणा-या कलाकारांमध्ये आवर्जुन उल्लेख करावा असे एक नाव म्हणजे सिया पाटील. घरी अभिनयाची पार्श्वभूमी नसतानादेखील मराठी फिल्म इंडस्ट्रीत स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारी ही अभिनेत्री. 'झक मारली बायको केली', 'कॅश करुनी अॅश करू', 'चल गंमत करू', 'नवरा माझ्या बायकोचा', 'भागम भाग', 'अपना सपना बोंबाबोंब', 'बाप रे बाप', मोहन आवटे, धूम टू धमाल, पक्याभाई यांसह अनेक मराठी सिनेमांमध्ये स्वतःचा ठसा उमटवणारी सिया लवकरच हिंदी सिनेमात झळकणार आहे.
'डोंबिवली रिटर्न' या बॉलिवूड सिनेमातती अभिनेता संदीप कुलकर्णीसोबत ती स्क्रिन शेअर करणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात सियाने संदीपसोबत इंटीमेट सीन्स दिले आहे. या दोघांचे सिनेमातील एक छायाचित्र अलीकडेच रिलीज करण्यात आले असून त्यामध्ये हे दोघे इंटीमेट होताना दिसत आहेत. (पुढील स्लाईडमध्ये तुम्ही हे छायाचित्र बघू शकता..)
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मराठी ते बॉलिवूड असा प्रवास करणा-या सियाचा जन्म सांगली जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील राजेवाडी येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानादेखील सियाने
आपले शिक्षण पूर्ण केले. प्रसंगी तिने सकाळी दोन तास दहावीचे गणिताचे क्लास घेतले आणि संध्याकाळी दोन तास पेट्रोलपंपावर आणि फूडवर्डवर अकाऊण्टण्टचे काम केले.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला सियाच्या संघर्षमय प्रवासाविषयी सांगत आहोत..
पुढील स्लाईडसमध्ये पाहा 'डोंबिवली रिटर्न' या सिनेमातील सिया आणि संदीपचे रिलीज झालेले छायाचित्र आणि तिस-या स्लाईड्सपासून जाणून घ्या सियाच्या संघर्षमय प्रवासाविषयी...