आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'अप्सरा\' सोनालीच्या बोल्ड लूकने वेधले सगळ्यांचे लक्ष, को-स्टार्ससोबत दिसली स्ट्राँग बाँडिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः  मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिची प्रमुख भूमिका असलेला  'तुला कळणार नाही' हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल झाला असून त्याला सिनेसरसिकांचा संमिश्र प्रतिसाद मिळतोय. अभिनेता सुबोध भावेसोबत सोनालीने चित्रपटात स्क्रिन स्पेस शेअर केली आहे. तर तिचा मितवामधील को-स्टार आणि जवळचा मित्र स्वप्नील जोशी याचा निर्माता आहे. 
 
अलीकडेच मुंबईत मराठी आणि हिंदी सेलिब्रिटींसाठी चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. स्क्रिनिंगला सई ताम्हणकर, शरद केळकर, मयुरी वाघ, पियुष रानडे, जयवंत वाडकर, गणेश आचार्य, सायली संजीव, कॉमेडियन सुनील पाल, कोरिओग्राफर फुलवा खामकर, संगीतकार निलेश मोहरीर, अमृता सुभाष, रसिका सुनील, सचिन पिळगावकर, निथा शेट्टी, अली अजगर, अरुण नलावडे, सुशांत शेलार, अविका गौर, मनीष रायसिंघानी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. 
 
विशेष म्हणजे यावेळी सोनालीच्या ग्लॅमरस लूकवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. ऑफ शोल्डर डिझायनर ड्रेसमध्ये सोनाली कमालीची सुंदर दिसली. शिवाय सई ताम्हणकर आणि स्वप्नील जोशी यांच्यासह तिची स्ट्राँग बाँडिंगसुद्धा दिसून आली.
 
पाहुयात, 'तुला कळणार नाही' या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला क्लिक झालेली सोनाली कुलकर्णीची खास छायाचित्रे...
 
फोटोः अजित रेडेकर 
बातम्या आणखी आहेत...