आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B\'day Spl: कवीमनाच्या स्पृहाचे होते आयएएस होण्याचे स्वप्न, जाणून घ्या Unknown Facts

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः 'अग्निहोत्र', 'उंच माझा झोका', 'एका लग्नाची तिसरी गोष्ट' यांसारख्या मालिकांतील लक्षवेधी भूमिकांमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री स्पृहा जोशी आज आपला 27 वा वाढदिवस साजरा करत आहे. 13 ऑक्टोबर 1989 रोजी मुंबईत स्पृहाचा जन्म झाला. अभिनेत्री आणि कवीमनाच्या स्पृहाचे यूपीएससी करून आयएएस होण्याचे स्वप्न होते.
एका मुलाखतीत स्पृहाने सांगितले होते, की अभिनयाचा विचार कधीच मनाला शिवलाही नव्हता. मात्र महाविद्यालयात एकांकिका केल्यानंतर सर्व काही बदलले. 'शाळा' कादंबरीवर आधारित नाटकात केलेल्या शिरोडकरच्या भूमिकेला उदंड प्रतिसाद मिळाला. यानंतर नाटकात असतानाच 'अग्निहोत्र' मालिका मिळाली. 'उंच माझा झोका'मध्ये रमाबाईंच्या भूमिकेसाठी निवड झाल्यावर दबाव होता; पण आईने आत्मविश्वास उंचावल्याने ती भूमिका लक्षणीय ठरली.
स्पृहाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत divyamarathi.com तुम्हाला तिच्याविषयीची खास माहिती देत आहे. बर्थडे गर्ल स्पृहाविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...