आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photo Of The Day: मराठमोळ्या स्पृहाचा हा हॉट अंदाज यापूर्वी पाहिला आहे का तुम्ही!!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्क : आपल्या अभिनयाने आणि कवितेने सर्वांना भूरळ पाडणाऱ्या स्पृहा जोशीने मराठी प्रेक्षकांना धक्का दिला आहे. सोशल नेटवर्किंग साइट इन्स्टाग्रामवर स्पृहाने एक अतिशय हॉट फोटो पोस्ट करून सर्वांना अवाक् केले आहे. स्पृहा नेहमीच सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. सध्या ती तिचे रंगभूमीवर गाजत असलेले नाटक 'डोन्ट वरी बी हॅपी' या नाटकाचे प्रमोशन सोशल साइट्सवरुन करत आहे. या फोटोपूर्वीसुद्धा स्पृहाने तिचे असेच  दिलखेचक अंदाजातील अनेक फोटोज इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. 
 
मुंबईत झाला जन्म
'अग्निहोत्र', 'उंच माझा झोका', 'एका लग्नाची तिसरी गोष्ट' यांसारख्या मालिकांतील लक्षवेधी भूमिकांमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री स्पृहा जोशी आता 27 वर्षांची आहे. स्पृहा जोशी मुंबईची आहे. शिवाजी पार्क परिसरामध्ये तिचे बालपण गेले असून बालमोहन विद्या मंदिरमधून तिने शिक्षण पूर्ण केले आहे. स्पृहाला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. तिला त्यासाठी बक्षिसेही मिळाली आहेत. शाळेत असताना तिला सर्जनशील लिखाणासाठीचा राज्य शासनाचा ‘बालश्री 2003’ हा पुरस्कारही मिळाला होता. स्पृहा पहिल्यांदा टीव्हीच्या पडद्यावर आली ती ‘दे धमाल’ या मालिकेमुळे. तेव्हा ती शाळेत असली तरी तिने साकारलेली हुशार मुलगी आजही अनेकांच्या स्मरणामध्ये आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, स्पृहाने इन्स्टाग्रामवर अलीकडच्या काळात शेअर केलेले फोटोज अर्थातच तिची इन्स्टा डायरी... 
बातम्या आणखी आहेत...