आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अगदी हटके लूकमधल्या या मराठमोळ्या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंय का!!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरील छायाचित्रात दिसणा-या या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंय का... काय म्हणता लक्षात येत नाहीये. अहो तुमचेही बरोबरच आहे म्हणा... हिला ओळखणे जरा कठीणच आहे. खरं सांगायचे म्हणजे आमचीही स्थिती तुमच्यासारखीच झाली होती. चला तर मग तुमची उत्सुकता जास्त ताणून न धरता ही कोण आहे आम्ही तुम्हाला सांगतो. 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' या मालिकेतील 'कुहू' तुम्हाला आठवतच असेल ना.. बरोबर ही आहे अभिनेत्री आणि कवियत्री स्पृहा जोशी. कुहूच्या रुपात अगदीच सामान्य तरुणींसारखी दिसलेली स्पृहा आता दिवसेंदिवस ग्लॅमरस होत आहे. ती आता स्वत:च्या लूकला घेऊन नवनवीन प्रयोग करत असते. 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' आणि 'एका लग्नाची तिसरी गोष्ट' या मालिकांमध्ये ती जराशी जाड आणि अगदी साधी दिसत होती. पण 'पेईंग घोस्ट' सिनेमादरम्यान तिचा लूक पूर्णपणे बदलला आहे. तिने केलेलं वेटलॉस आणि त्याचबरोबर वेर्स्टन आउटफिटमध्ये केलेले फोटोशूट त्यामुळे तिचा लूक पूर्णपणे वेगळा झाला आहे. आणि अर्थातच तो खूप चांगला आहे.
फोटोग्राफर तेजस नरूळेकर यांनी तिचा हा हटके लूक आपल्या कॅमे-यात क्लिक केला आहे. स्पृहाने हा फोटो आपल्या सोशल अकाउंटवर शेअर करुन लिहिले, When expressions rule the world!!
या फोटोत ती कॉलेजला जाणा-या टीनेएजर सारखी दिसत आहे. या फोटोला हजारो लाईक्ससुद्धा मिळाले आहेत. स्पृहाने केलेले हे पहिलेच फोटोशूट नाहीये. अगदी काही दिवसांपूर्वी तिचे केलेल्या निळ्या टॉपमधले फोटोशूट आणि यलो वनपीसमधल्या फोटोंना हजारोंनी लाईक्स मिळाले आहेत.
स्पृहाच्या लेटेस्ट फोटोशूटची खास झलक तुम्ही पुढील स्लाईड्समध्ये बघू शकता..
फोटो साभारः स्पृहा जोशी फेसबुक अकाउंट
बातम्या आणखी आहेत...