आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'दिल दोस्ती दुनियादारी\'मधून लोकप्रिय झालेल्या स्वानंदीचे हे सालस रुप यापूर्वी पाहिलंय का तुम्ही!!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वरील छायाचित्रात दिसणा-या या अभिनेत्रीला तुम्हील ओळकलंत का? अहो ही आहे 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री स्वानंदी टिकेकर. खरं तर स्वानंदीला आपण नेहमी जीन्स आणि टीशर्टमध्येच पाहिलंय. पण यावेळी स्वानंदीचं रुपंच पालटलंय. यावेळी स्वानंदी चक्क साडीत दिसतेय. त्यामुळे तिचे पारंपरिक हे रुप नक्कीच लक्ष वेधून घेत आहे.


स्वानंदीने  अलीकडेच  प्रथा या साड्यांच्या प्रसिद्ध ब्रॅण्ड्ससाठी खास फोटोशूट केले आहे. या फोटोशूटसाठी स्वानंदीने गुलाबी रंगाची बारीक काठ असलेली पिवळ्या रंगाची साडी नेसलेली दिसते. त्यावर साजेसा असा हार आणि बांगड्याही तिने घातल्याचे दिसते. शिवाय निळ्या रंगाच्या साडीतसुद्धा स्वानंदीने फोटोशूट केले आहे. प्रसिद्ध फोटोग्राफर आझाद पवार यांनी स्वानंदीचे सोज्वळ रुप आपल्या कॅमे-यात बंदिस्त केले आहे. स्वानंदी आणि आझाद पवार यांनी या फोटोशूटची खास झलक त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे. 


चला तर मग पाहुयात, स्वानंदीच्या या फोटोशूटची खास झलक...


फोटो साभार- आझाद पवार फेसबुक आणि स्वानंदी टिकेकर इन्स्टाग्राम अकाउंट 

बातम्या आणखी आहेत...